Next
उद्योजकता
BOI
Tuesday, July 10, 2018 | 10:35 AM
15 0 0
Share this story

मराठी माणूस मागे का पडतो? संकुचित वृत्ती, गाव न सोडणे, नवीन प्रयोग नाही, चमचेगिरी व शिपाईगिरी, जबाबदारी झटकणे अशी आणखीही काही कारणे प्रकाश भोसले यांनी सांगितली आहेत. एवढेच नव्हे, तर उद्योजकतेविषयी सर्व मुद्द्यांचा समावेश त्यांनी त्यांच्या या पुस्तकात केला आहे.

ज्यू लोक जगात सर्वांत यशस्वी आणि श्रीमंत का आहेत, या प्रश्नाचा मागोवा ते प्रारंभी घेतात. करिअर कौन्सेलिंग, ई-कॉमर्स, आर्थिक निरक्षरता, निर्णय क्षमता, टाइम मॅनेजमेंट अशा विषयांवर त्यांनी स्वतंत्रपणे चर्चा केली आहे.

टिप्स किंवा सल्ले हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. यशस्वी उद्योजक होण्यासाठी महत्त्वाचे गुण, गरिबीतून श्रीमंत बनण्याच्या ४५ टिप्स, मुलांना यशस्वी उद्योजक कसे बनवाल- ३० टिप्स अशी याची उदाहरणे आहेत. मराठी माणसाचा विकास सहकार्यानेच होतो, असेही ते म्हणतात.   

प्रकाशक : E Branding India Technoligies
पाने : १९८
किंमत : २२० रुपये
     
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link