Next
रत्नागिरीत जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठक
BOI
Tuesday, October 16, 2018 | 05:23 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी : जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची बैठक १६ ऑक्टोबर २०१८ रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

या वेळी जिल्हा पुरवठा अधिकारी जयकृष्ण फड, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नरेंद्र तुपे, एस. ई. हाश्मी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. एस. जगताप, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी एस. आय. कांबळे यांसह जिल्हा ग्राहक समितीचे शकील मुजावर, मिलिंद नांदगावकर, दिनकर आमकर, दत्तात्रय मयेकर, डॉ. सुनील दैठणकर, संदीप कदम, संदीप सुर्वे, रशीद गोदड, सोहेल मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांनी रिक्षा भाडे, दुध भेसळ, वाढीव वीज देयक, वीज पेाल बदलणे आदी विषयांवर चर्चा केली. ‘रिक्षा चालकांनी रिक्षा मीटरप्रमाणे दर आकारणे आवश्यक असताना काही ठिकाणी आकरण्यात येत नाही, याबाबत उपप्रादेशिक कार्यालयातील संबधितांनी आवश्यक ती कार्यवाही करावी,’ अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.

दुधाची उत्पादकता आणि दुधाची मागणी यामध्ये मोठी तफावत आहे या तक्रारीबाबत बोलताना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यात दुधाचे सॅम्पल तपासणी करून दुध विक्रेत्यांकडून अंडरटेकिंग लिहून घ्याव्यात आणि दोषी आढळल्यास कारवाई करण्याच्या सूचना अन्न व प्रशासन विभागाला दिल्या. वाढीव वीज देयक, वीज पेाल बदलणे याबाबत संबधितांना सूचना देण्यात येतील, असे सांगितले.

या वेळी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीच्या सदस्यांनी रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या एसटी गाडयांची संख्या वाढवावी, शासकीय जागेमधील अनधिकृत गाळे, बाजार समिती दर आणि प्रत्यक्षात विक्री यामधील तफावत आदी विषयांवरही चर्चा केली.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी एक सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत मतदार वाढीसाठी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत १८ वर्ष पूर्ण अथवा एक जानेवारी २०१९ रोजी १८ वर्षे पूर्ण होत आहे, अशा व्यक्तींची नावे मतदार यादीमध्ये विहित नमुना अर्ज भरून नोंदवावीत. मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search