Next
वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी
दोन वृद्धांवर हृदयाला किमान छेद देऊन शस्त्रक्रिया यशस्वी
प्रेस रिलीज
Monday, April 01, 2019 | 02:21 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमधील कार्डिओ थोरिअॅक सर्जन डॉ. मंगेश कोहाळे यांच्या नेतृत्वाखालील टीमने ६५ वर्षीय महिला रुग्ण आणि ५६ वर्षीय पुरुष रुग्ण यांच्यावर किमान छेद देत (मिनिमल इन्व्हेसिव्ह) शस्त्रक्रिया केल्या. हा भारतात हृदय शस्त्रक्रियेचा नवीन प्रकार आहे.

हृदयाच्या रक्तवाहिनीच्या विकारावर उपचार करण्यासाठी करोनरी बायपास शस्त्रक्रिया करण्याचे आधुनिक तंत्र आहे. या तंत्रामध्ये हृदयाच्या एका बाजूला ४-६ सेमीचा छेद देऊन हृदयात प्रवेश केला. स्तनाग्राच्या खालच्या बाजूला हा छेद दिला. बरगडीच्या हाडांना छेद न देता आणि स्नायूंना न दुभंगता छातीमध्ये प्रवेश करण्यात आला.

६५ वर्षीय महिला रुग्णाला धाप लागत होती. त्यांची टूडी इको चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्यांना द्विदली झडपेचा विकार असल्याचे निदान झाले व त्यांना रिप्लेसमेंट उपचाराचा सल्ला देण्यात आला. डॉ. कोहाळे आणि टीमने छातीच्या उजव्या बाजूला सहा सेमीचा छोटासा छेद देत मिनिमल इन्व्हेसिव्ह मायट्रल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट (द्विदली झडप बदल) शस्त्रक्रिया केली. ५६ वर्षीय पुरुष रुग्णाच्या छातीत गेल्या दोन महिन्यांपासून वेदना होत होत्या आणि मुख्य रक्तवाहिनीमध्ये ९० टक्के गुठळ्या झाल्या होत्या. डॉ. कोहाळे यांनी छातीच्या डाव्या बाजूने सहा सेमीचा छेद देऊन मिनिमल इन्व्हेसिव्ह बायपास शस्त्रक्रिया केली.

करॉनरी अर्टरी बायपास सर्जरी (सीएबीजी) आणि झडप बदल शस्त्रक्रिया करवून घेणाऱ्या वृद्धांची संख्या वाढतच चालली आहे. दोन्ही रुग्णांवर डॉ. कोहाळे यांनी किमान छेद देत शस्त्रक्रिया केली. ही शस्त्रक्रिया प्रत्येक रुग्णासाठी योग्य नसते. त्यामुळे अशा शस्त्रक्रियेच्या बाबतीत काळजीपूर्वक रुग्ण निवडावे लागतात. कारण हृदयात डोकावण्यासाठी अत्यंत कमी भाग असतो आणि या शस्त्रक्रियेच्या बाबतीत रुग्णांची निवड फारच महत्त्वाची असते.

मुंबई सेंट्रल येथील ‘वोक्हार्ट’मधील कार्डिओ थोरिअॅक सर्जन डॉ. कोहाळे म्हणतात, ‘पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेने मिनिमली इन्व्हेसिव्ह कार्डिअॅक सर्जरीचे अनेक फायदे असतात. अशा शस्त्रक्रियेमध्ये हाडे कापावी लागत नाहीत, वेदना कमी करण्यासाठीही या शस्त्रक्रियेची मदत होते आणि रुग्ण ड्रायव्हिंग आणि इतर अनेक क्रिया करू शकतात, रक्तस्त्राव किमान असल्याने बहुतांश रुग्णांना ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज भासत नाही आणि रक्तस्त्रावामुळे होणारे संसर्ग टाळता येतात. त्यामुळे संसर्गालाचा प्रतिकार करण्याची क्षमता कमी असलेल्या मधुमेही आणि वृद्धांसाठी ही शस्त्रक्रिया आदर्श ठरते.’

हृदयशस्त्रक्रिया ही पारंपरिकदृष्ट्या नॉन-कॉस्मेटिक होती आणि आता ती पाच ते सहा सेमीच्या छेदासह कॉस्मेटिक सर्जरी होत आहे. या सर्व लाभांमुळे हॉस्पिटलमधील वास्तव्य कमी असते आणि प्रकृतीही वेगाने सामान्य होते. या शस्त्रक्रियेचा सर्वोत्तम उपाय म्हणजे हृदयातील कोणत्याही भागात गुठळ्या झाल्या असतील तर त्या सुरक्षित आणि अपेक्षित परिणामांसह बायपास करता येऊ शकत असल्याचे डॉ. कोहाळे यांनी सांगितले.

‘आम्ही मिनीमल इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेबद्दल समाधानी आहोत. आमची दिनचर्या सामान्य झाली आहे आणि वेदनाही कमी आहेत. ही शस्त्रक्रिया समजविल्याबद्दल आणि या शस्त्रक्रियेच्या जमेच्या व उण्या बाजू समजावून दिल्याबद्दल आम्ही डॉ. मंगेश यांचे आभारी आहोत,’ अशी प्रतिक्रिया रुग्णांनी व्यक्त केली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search