Next
प्रियदर्शिनी गोविंद यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध
प्रेस रिलीज
Wednesday, August 08, 2018 | 11:32 AM
15 0 0
Share this story

पुणे : संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्या भरतनाट्यम कलाकार प्रियदर्शिनी गोविंद यांच्या भरतनाट्यमच्या ‘संप्रदाय- अनफोल्डिंग द ट्रॅडिशन्स’ कार्यक्रमाने नृत्य रसिकांची वाहवा मिळवली. या कार्यक्रमाचे पुण्यात प्रथमच आयोजन केले होते.

प्रसिद्ध चित्रपट कलाकार अमोल पालेकर यांच्या हस्ते प्रियदर्शनी गोविंद यांचा सन्मान करण्यात आला. नृत्ययात्री संस्थेच्या संस्थापक मेघना साबडे यांनी स्वागत केले. ‘नृत्ययात्री’तर्फे आयोजित हा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे झाला. रसिकांच्या भरघोस प्रतिसादात आणि उत्साहात कार्यक्रमाची सुरुवात ‘कार्तिके’वर आधारित श्लोकाने झाली. ‘वर्णम’ या नृत्यप्रकारातून शंकरांच्या वेगवेगळ्या रूपांचे आणि आभूषणांचे वर्णन केले गेले.

यानंतर प्रियदर्शनी यांनी काही अभिनयप्रधान रचना सादर केल्या. युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या मुलाच्या आईची मन:स्थिती रसिकांसमोर मांडण्यात आली, तर पुढच्या पदातून स्वतःचा नवरा परदेशी गेल्यावर प्रियकराला बोलावून घेणारी मिश्किल स्त्री सादर करण्यात आली. कार्यक्रमाची सांगता तिल्लाना आणि अभंगाने झाली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुण्यातील प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक परिमल फडके यांनी केले. कार्यक्रमाला ‘नृत्ययात्री’च्या मेघना साबडे, श्रद्धा पळसुळे, मालती कलमाडी, प्राची जावडेकर, योगेश गोगावले यांसह पुण्यातील सर्व नृत्यगुरू उपस्थित होते. प्रियदर्शिनी गोविंद, सध्याच्या पिढीतील भरतनाट्यममधील प्रमुख कलाकारांपैकी एक आहेत. संगीत नाटक अकॅडमी २०१२ च्या त्या विजेत्या आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link