बहुआयामी लेखक आणि समीक्षक डॉ. रवींद्र केशवराव शोभणे आणि ‘निशिगंध’ नावाने लिहिणारे लेखक रामचंद्र श्रीपाद जोग यांचा १५ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय... ....
डॉ. रवींद्र केशवराव शोभणे
१५ मे १९५९ रोजी जन्मलेले डॉ. रवींद्र केशवराव शोभणे हे कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून ओळखले जातात. ‘कादंबरीकार श्री. ना. पेंडसे’ या विषयावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती.
खर्सोलीच्या शाळेत असताना विद्यार्थीदशेतच नाटक लिहून त्यांनी आपली लिखाणातली चुणूक दाखवली होती. अनेकविध विषयांवर लिहिते राहून त्यांनी बहुआयामी लेखक अशी प्रतिमा निर्माण केली आहे.
पडघम, पांढर, पांढरे हत्ती, शहामृग, वर्तमान, अदृष्टाच्या वाटा, ऐशा चौफेर टापूत, अश्वमेध, चंद्रोत्सव, चिरेबंद, दाही दिशा, कोंडी, महाभारत आणि मराठी कादंबरी, महाभारताचा मूल्यवेध, मराठी कविता : परंपरा आणि दर्शन, ओल्या पापाचे फूत्कार, रक्तध्रुव, संदर्भासह, सत्त्वशोधाच्या दिशा, सव्वीस दिवस, तद्भव, त्रिमिती, उत्तरायण, अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
(डॉ. रवींद्र शोभणे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.) ......
रामचंद्र श्रीपाद जोग
१५ मे १९०३ रोजी जन्मलेले रामचंद्र श्रीपाद जोग हे ‘निशिगंध’ या टोपण नावाने लेखन करायचे.
ज्योत्स्नागीत, निशागीत, अभिनव काव्यप्रकाश, काव्यविभ्रम, सौंदर्यशोध आणि आनंदबोध, चर्वणा, अर्वाचीन मराठी काव्य, दक्षिणा, केशवसुत काव्यदर्शन, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वाङ्मयेतिहासाच्या तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या खंडाचे ते संपादक होते. तसेच १९६० साली ठाण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
२१ फेब्रुवारी १९७७ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)