Next
अमृता फडणवीस यांचे मराठीत पार्श्वगायन
प्रेस रिलीज
Saturday, July 29 | 12:15 PM
15 0 0
Share this story

अमृता फडणवीसपुणे : ‘ग्रॅव्हेटी एंटरटेन्मेंट’ प्रस्तुत, मिहिर सुधीर कुलकर्णी निर्मित व रामकुमार गोरखनाथ शेडगे दिग्दर्शित ‘अ ब क’ या मराठी चित्रपटासाठी अमृता देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पार्श्वगायन केले.

‘पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ असे गीताचे बोल असून, ‘बेटी बचाव बेटी पढाओ’ या विषयावर भाष्य करणाऱ्या चित्रपटात त्यांनी मराठी आणि हिंदी अशी दोन गीते गायली आहेत. या गीतांना प्रसिद्ध संगीतकार बापी - टुटूल यांनी संगीतबद्ध केले असून, मराठी गीत अश्विनी शेंडे यांनी, तर हिंदी गीत श्यामराज दत्ता यांनी लिहिले आहे.चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांचे आहे.

अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’सारख्या वेगळ्या विषयावरील चित्रपटाची आज गरज आहे. मुला-मुलींमध्ये भेदभाव न करता मुलींनाही दर्जात्मक शिक्षण दिले पाहिजे. हे गीत प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी ठरेल.’ 

‘पेटून उठू दे, आज एक ज्वाला’ या गीताचे अनावरण पाच ऑगस्ट रोजी श्री श्री रविशंकर यांच्या बेंगळुरू येथील  आश्रमात श्री श्री रविशंकर, किरण बेदी, अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link