Next
‘एअर एशिया’तर्फे ‘बिग सेल’ची घोषणा
प्रेस रिलीज
Tuesday, November 13, 2018 | 05:29 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘एअर एशिया’तर्फे पुन्हा एकदा ‘बिग सेल’ची घोषणा करण्यात आली आहे. या उपक्रमात आशिया, ऑस्ट्रेलिया आणि त्यापलीकडील १२० ठिकाणी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जोडले जात आहे. सहा मे २०१९ ते चार फेब्रुवारी २०२० या कालावधीतील प्रवासासाठी बिग मेंबर्स ११ ते १८ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत बुकिंग्स करू शकणार आहेत. या प्रवासासाठीचे एकेरी प्रवास भाडे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी अनुक्रमे ३९९ रुपये ते एक हजार ९९९ रुपये या किंमतीत आकारले जाणार आहे.

सर्वसमावेशी अशा ३९९ रुपयांच्या एकेरी प्रवासाचा लाभ घेण्यासाठी एअरएशिया इंडियाच्या २१ गंतव्य स्थानांपैकी कोणत्याही ठिकाणाची निवड प्रवासी करू शकणार आहेत. यात बेंगळुरू, नवी दिल्ली, कोलकाता, कोची, गोवा, जयपूर, पुणे, गुवाहाटी, इंफाळ, विशाखापट्टणम, हैद्राबाद, श्रीनगर, बागडोगरा, रांची, भूवनेश्वर आणि इंदूर या ठिकाणांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी एकेरी भाडे एक हजार ९९९ रुपयांपासून सुरू होत असून, यात क्वालालम्पूर, बॅंकॉक, क्राबी, सिडनी, ऑकलण्ड, मेलबर्न, सिंगापूर, बाली आणि अन्य स्थानांचा समावेश आहे.

ही ऑफर एअरएशिया समुहाच्या एअरएशिया इंडिया (विमान कोड आय५), एअरएशिया बेऱ्हाद (विमान कोड एके), थाई एअरएशिया (विमान कोड एफडी) आणि एअर एशिया एक्स (विमान कोड डी७) या विमानांसाठी लागू होणार आहे. संकेतस्थळावरून आणि एअर एशियाच्या मोबाइल अपवरून केलेल्या बुकिंग्ससाठी ही सवलत ऑफर लागू होणार आहे.

एअर एशियाचे संकेतस्थळ : airasia.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search