Next
‘दिलखुलास’मध्ये एमपीआयडी कायद्यावर मुलाखत
प्रेस रिलीज
Friday, February 08, 2019 | 05:37 PM
15 0 0
Share this story



मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता, राज्य आर्थिक गुन्हे विभागाचे अपर पोलीस महासंचालक प्रभात कुमार, मुंबई आर्थिक गुन्हे शाखा मुंबईचे सह पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांची 'आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी एमपीआयडी कायदा' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे.

ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून ११, १२, १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्रातील आर्थिक गुन्ह्यांची सद्यस्थिती, एमपीआयडी कायदा व या कायद्यात सद्यस्थितीत केलेल्या सुधारणा, महाराष्ट्रात खासगी ठिकाणी गुंतवणूक करत असताना नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी, गुंतवणूकदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना याबाबतची सविस्तर माहिती या कार्यक्रमातून दिली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link