Next
‘थ्रीडी प्रिंटरचा प्रभावी वापर भारतात बेघरांसाठी करणे शक्य’
महाकाय थ्रीडी प्रिंटरचे जनक एन्रिको डिनी यांचा विश्‍वास
प्रेस रिलीज
Thursday, February 21, 2019 | 04:22 PM
15 0 0
Share this article:

स्वागत करताना डावीकडून डॉ. शुभदा कमलापूरकर, पाउलो कार्बोनी आणि एन्रिको डिनी व डॉ अनुराग कश्यप

पुणे : ‘घरे व इमारतींची उभारणी छपाई तंत्रज्ञानाने करून जगाला थक्क करून सोडणार्‍या महाकाय थ्रीडी प्रिंटरचे जनक एन्रिको डिनी यांनी भारतात या तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर शक्य आहे,’ असे महाकाय थ्रीडी प्रिंटरचे जनक एन्रिको डिनी यांनी सांगितले. ‘विशेषत: बेघरांना घरे उभारण्यासाठी किफायतशीर असणारे हे तंत्रज्ञान इथे वापरण्यासाठी आपण उत्सुक आहोत,’ अशी तयारीही त्यांनी दर्शवली.

महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमध्ये (बीएनसीए) ते थ्रीडी प्रिंटरच्या उत्क्रांतीबद्दल केलेल्या सादरीकरणात बोलत होते. डीनी यांची ही पहिलीच पुणे भेट असून, हा कार्यक्रम आर्किटेक्ट पूनम सरदेसाई यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आला. या वेळी डिनी यांची मुलाखत प्रा. रिपल पटेल यांनी टॉक शोदरम्यान घेतली.

इटलीतील डी-शेप या कंपनीचे जनक असणारे डिनी व त्यांचे सहकारी पावलो कार्बोनी यांनी ‘बीएनसीए’मधील व देशातील पहिल्या फॅबलॅबमध्ये असणार्‍या थ्रीडी प्रिंटर, सीडी स्कॅनर तसेच रोबोटिक आर्मची पाहाणी करून समाधान व्यक्त केले. ‘बीएनसीए’चे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप, शिक्षण विभाग प्रमुख डॉ. शुभदा कमलापूरकर आणि डिजिटल आर्किटेक्चर विभागप्रमुख प्रा. धनश्री सरदेशपांडे यांनी डीनी यांचे स्वागत केले.

पाउलो कार्बोनी आणि एन्रिको डिनी

डॉ. कश्यप यांनी डीनी यांचा थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करणारे देव आहेत, या शब्दांत गौरव केला. ते म्हणाले, ‘अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत डीनी यांनी थ्रीडी प्रिंटरचा शोध लावला असून, अशा यशस्वी कहाणीचा आदर्श ‘बीएनसीए’च्या विद्यार्थिनींपुढे राहील. भारतात बिहारमधील ग्रामीण भागात मातीच्या मदतीने मोठ्या प्रमाणावर स्वच्छतागृहे उभारण्यासाठी थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर जपानच्या मदतीने होत आहे. त्यामुळे भारतीय वास्तूकलेत थ्रीडी प्रिंटर ही एक महत्त्वाची बाब असून, तिचा वापर नजीकच्या भविष्यात वाढेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.’

प्रा. सरदेशपांडे यांनी म्हणाल्या, ‘भारतात आज डिजिटल तंत्रज्ञान येत असताना थ्रीडी प्रिंटिंगसारखे तंत्रज्ञान हे वरदान ठरणारे आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत डिजिटल तंत्रज्ञान अपरिहार्य बनत असताना त्याचा वास्तूकलेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबद्दल मात्र अद्याप आपण साशंक आहोत. हे चित्र बदलायला हवे. भारतीय संस्कृती, पर्यावरण, तसेच बांधकाम क्षेत्रात याचा अंतर्भाव व्हायला हवा. डीनी यांनी थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानात वाळू, माती, खारे पाणी आणि या सार्‍यांना एकत्र बांधून ठेवणार्‍या रासायनिक घटकांच्या वापरातून केला गेला आहे. आज त्या अर्थाने त्यांची ही भेट महत्त्वाची आहे.’

डीनी यांनी आपल्या या रोमहर्षक शोधाचा इतिहास पॉवरपॉइंट सादरीकरणातून मांडला. ते म्हणाले, ‘थ्रीडी प्रिंटरच्या शोधाच्या उद्दिष्टाप्रती चाललेला आपला हा प्रवास एक प्रकारे स्वत:चाच शोध असतो. असे शोध हे केवळ अपघात नसून ते शून्यातून घडतात. यासाठी माझ्यापुढेही १९६०च्या दशकात इटलीत व्हेस्पा स्कूटरचा शोध लावणार्‍या कोरोदोने दिस्कानियो यांचा आदर्श होता. साध्या वाळूचा उपयोग करत असताना पुढे पर्यावरणपूरक सेंद्रिय घरे तयार करत संगणकाच्या मदतीने एक खास सॉफ्टवेअर तयार केले. यातून होणार्‍या नवनिर्मितीतील सौंदर्य व स्वातंत्र्य उपभोगण्याचा आनंदही मला घेता आला. यासाठी वास्तूकला, गणित, अभियांत्रिकी अशा आंतरविद्याशाखीय पद्धतीचा वापर त्यासाठी करण्यात आला. २००८ ते २०१४पर्यंत आपण थ्रीडी प्रिंटिंग क्षेत्रात विविध कामे करू शकलो.’

भारतातली आपली ही दुसरी भेट आहे, असे सांगून डिनी पुढे म्हणाले, ‘आज हा देश बदलाच्या उंबरठ्यावर असून, लोकसंख्या हा इथला मोठा प्रश्‍न आहे. त्यातूनच वाढत्या शहरीकरणावर व बेघरांसाठी थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने आपण घरे छापू शकू. हे इथल्या नैसर्गिक साधनांमधूनच ते करता येईल. एरव्ही हे तंत्रज्ञान श्रीमंत राष्ट्रांमधील घरांसाठी केले जाते. आता जगभरात थ्रीडी प्रिंटर वापरण्याची लाटच उसळली आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search