Next
डॉ. आंबेडकर महाविद्यालयात ‘आरोग्य आणि आहार’वर कार्यक्रम
प्रेस रिलीज
Friday, July 19, 2019 | 04:21 PM
15 0 0
Share this article:


औंध : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ‘आरोग्य आणि आहार’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. सोनल सरोदे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी भूषविले. या प्रसंगी प्रा. नलिनी पाचर्णे, प्रा. गौरी पवार, प्रा. स्नेहल रेडे, डॉ. अतुल चौरे यांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सरोदे म्हणाल्या, ‘बाहेरचे अन्न आणि जंक फूड खाल्ल्याने वेगवेगळे आजार होतात. बेकरीमधील पदार्थ, कोल्ड्रिंग,  पिझ्झा-बर्गर या आणि यांसारख्या इतर पदार्थांमुळे आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. जंक फूड खाल्ल्याने आपली निर्णय क्षमता कमी होते; तसेच ते खाण्याचे व्यसन लागते. त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहात नाही. आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सात्विक आहार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या आहारात जास्तीत जास्त पालेभाज्या असायला हव्यात. त्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. आपल्या रोजच्या आहारात खजूर, ताक, दूध, फळे आणि इतर पदार्थांचा समावेश असायला हवा. चांगल्या आरोग्यासाठी रोज योगासने करणे गरजेचे आहे.’


कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मेनकुदळे म्हणाले, ‘निसर्गाने स्त्रियांना नवनिर्मितीची क्षमता दिली आहे. त्यामुळे स्त्रियांनी मानसिक, शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम असायला हवे. पुणे शहराला ऐतिहासिक आणि शैक्षणिक वारसा लाभला असून, आजच्या तरुणांनी महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे साहित्य, तसेच आपल्या ज्ञानाची क्षमता आणि बौद्धिक क्षमता वाढविण्यासाठी महापुरुषांचे चरित्र वाचले पाहिजे. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आपल्या साहित्यामधून स्त्रियांमधील क्षमतांची जाणीव करून दिली आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी भारत हा तरुणांचा देश असल्याने तो जगात महासत्ता होईल. फक्त आजच्या तरुणांना दिशा देण्याची गरज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना दिशा देण्याचे कार्य रयत शिक्षण संस्था आणि महाविद्यालय करीत आहे.’

पाहुण्यांची ओळख प्रा. आसावरी शेवाळे यांनी करून दिली. प्रा. सायली गोसावी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search