Next
नाट्य, नृत्याविष्कारातून विद्यार्थ्यांचे शिक्षकांना अभिवादन
प्रेस रिलीज
Friday, September 07, 2018 | 05:46 PM
15 0 0
Share this article:

शिक्षकदिनानिमित्त ‘गोयल गंगा इंटरनॅशनल स्कुल’च्या विद्यार्थ्यांनी  नाटूकली आणि नृत्याविष्कार सादर केले. या वेळी संचालिका सोनू गुप्ता, मुख्याध्यापिका भारती भागवाणी यांच्यासह पालक, शिक्षकवर्ग उपस्थित होता.

पुणे : आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षकदिनाचे औचित्य साधून, ‘गोयल गंगा इंटरनॅशनल स्कुल’च्या विद्यार्थ्यांनी छोटी नाटूकली आणि नृत्याविष्कार सादर केले. शिक्षकांना फुले आणि भेटवस्तू देऊन शिक्षकदिन साजरा करण्यात आला.

‘शिक्षक विद्यार्थ्यांना फक्ती पुस्तकी ज्ञान न देता खऱ्या अर्थाने घडवत असतात, जीवनाला सामोरे कसे जायचे हेही शिकवत असतात म्हणूनच त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. इथून बाहेर पडल्यानंतरही आमच्या मनात शिक्षकांबद्दलचा आदर आणि आपुलकी कायम असेल’, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका भारती भागवाणी, संचालिका सोनू गुप्ता, इतर शिक्षक आणि पालकही उपस्थित होते.   

‘विद्यार्थ्यांचा कल ओळखून, शिक्षक त्यांना त्या-त्या क्षेत्रात पारंगत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात आणि ते आम्ही कायम करत राहू’, असे शाळेच्या मुख्याध्यापिका भारती भागवाणी यांनी सांगितले.

‘विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार, आधार आणि अमोघ ज्ञान देणाऱ्या प्रत्येक शिक्षकाचा सन्मान हा आजच्या दिवसापुरता मर्यादित न राहता नेहमीच केला गेला पाहिजे’, असे मत सोनू गुप्ता यांनी व्यक्त केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search