Next
‘महिलांचे मन:स्वास्थ्य जपणे आवश्यक’
प्रेस रिलीज
Thursday, March 08, 2018 | 05:56 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘अर्धा समाज हा महिलांचा आहे. त्यामुळे महिलांचे मन:स्वास्थ्य उत्तम असेल, तरच संपूर्ण समाजाचे स्वास्थ्य उत्तम राहील’, असे मत संमोहनतज्ज्ञ आरती काटे यांनी व्यक्त केले.आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, ‘महेश काटे हिप्नोथेरपी आणि रेमेडी  सेंटर’(एमकेएचआरसी)तर्फे पिंपळे सौदागर येथे, ‘महिला आणि मानसिक आरोग्य’, या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी काटे बोलत होत्या.  

नगरसेविका निर्मला कुटे, आरती चोंदे, सविता खुळे, नगरसेवक शत्रूघ्न काटे, पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे, सामाजिक कार्यकर्त्या चंदा भिसे, ‘एमकेएचआरसी’चे संचालक महेश काटे या वेळी उपस्थित होते. 

काटे पुढे म्हणाल्या, ‘महिलांना मतदानाचा हक्क मिळावा, महिलांना अधिकार मिळावेत, त्यांना समान मानले जावे, मुख्य म्हणजे त्यांना माणूस म्हणून अधिकार मिळावेत, अशा अनेक कारणांसाठी महिलांनी लढे दिले आणि त्यातून महिला दिन तयार झाला. पण, अजूनही महिलांना मन:स्वास्थ्य लाभलेले नाही.’

या वेळी महेश काटे म्हणाले, ‘आज अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी उत्तुंग कामगिरी केल्याचे दिसते. पण ही उदाहरणे सार्वत्रिक व्हायला हवीत. त्यासाठी महिला मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे. महिलांचे मानसिक आरोग्य जर निकोप असेल, तर आणि तरच निकोप समाजाची निर्मिती होऊ शकेल. त्यामुळे आपल्याला निकोप समाज निर्माण करायचा असेल, तर महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.’

 ‘महिलांना स्वतःसाठी अगदी कमी वेळ मिळतो. किंबहुना, तो मिळताच नाही. यामुळे मग अनेक समस्या सुरु होतात. ज्या बहुतांशी मानसिक असतात. चिडचिड, डोकेदुखी सारख्या समस्या उदभवतात. कधी कधी, ही समस्या अगदी गंभीर रूप घेते. अनेकवेळा मानसिक तसेच मनो-कायिक आजार होतात. ताण घालवायचा असेल, तर महिलांनी स्वतःला थोडा वेळ द्यायला हवा. केवळ ताण घालवून उपयोग नाही, तर आपले आयुष्य सुंदर केले पाहिजे. त्यासाठी महिलांना मानसिकदृष्ट्या रिलॅक्स व्हायला हवे. यासाठी समुपदेशन आणि संमोहन उपयुक्त ठरते. अनेक प्रश्नांवर सहज मात करता येते, असेही काटे म्हणाल्या.
नगरसेविका निर्मला कुटे म्हणाल्या, ‘दैनंदिन आयुष्यात महिला मोठ्या पदांवर कार्यरत असतात, पण तरीही त्यांना घरच्या जबाबदाऱ्या पार पाडव्याच लागतात.’

नगरसेविका सविता खुळे म्हणाल्या, ‘ महिलांसाठी मानसिक आरोग्य शिबिरांची गरज आहे. त्याकरता पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुढाकार घेईल.’

नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, ‘समाजामध्ये अनेक पुरुष महिलांमुळे घडले आहेत. त्यामुळे महिलांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.’

या वेळी महिलांच्या मानसिक आरोग्याच्या विविध प्रश्नांसदर्भात संमोहनतज्ज्ञ काटे यांनी मार्गदर्शन केले. स्वाती सूर्यवंशी आणि पूजा वाळके यांनी संमोहनाविषयीचे स्वानुभव मांडले.

‘एमकेएचआरसी’चे संचालक महेश काटे यांनी प्रास्ताविक केले आणि आभार मानले. विकास काटे यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link