Next
राष्ट्रीय कॅरम पंच परीक्षेत प्रा. राहुल बर्वे प्रथम
BOI
Tuesday, February 05, 2019 | 05:25 PM
15 0 0
Share this storyरत्नागिरी : नागपूर येथे राष्ट्रीय कॅरम पंच परीक्षेत रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनचे सदस्य प्रा. राहुल दत्तात्रय बर्वे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. परीक्षेत २६  उमेदवार सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मधुकर पेडणेकर यांनी देशात चौथा क्रमांक प्राप्त केला.

४६ व्या ज्युनिअर राष्ट्रीय आणि आंतरराज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. पंच परीक्षेची तयारी करताना प्रा. बर्वे यांना आंतरराष्ट्रीय रेफ्री अजित सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. १९९९मध्ये नागपूर येथे राष्ट्रीय परीक्षेत अजित सावंत यांनीही देशात पहिला क्रमांक मिळविला होता. २० वर्षांनी प्रा. बर्वे यांनी नेत्रदीपक कामगिरी करत रत्नागिरीचा झेंडा रोवला.

प्रा. बर्वे यांच्या यशाबद्दल म्हाडाचे अध्यक्ष व आमदार उदय सामंत, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष शिवकुमार लाड, मानद सचिव अरुण केदार, सह्याद्री शिक्षण संस्थेचे प्रमुख शेखर निकम, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य किरण सामंत, जिल्हा परिषद सदस्य रोहन बने, जिल्हा कॅरम असोसिएशनचे सल्लागार सुचय रेडीज, अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते, स. रा. देसाई अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या मंजिरी साळवी आदींनी अभिनंदन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Arun Kulkarni About 17 Days ago
Congratulations for your success... And all the best to you to be the best carrom-umpire !
0
0

Select Language
Share Link