Next
जर्मनीलाही मागे टाकणार भारतीय अर्थव्यवस्था
BOI
Monday, May 01, 2017 | 10:00 AM
15 1 0
Share this article:

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (इंटरनॅशनल मॉनेटरी फंड) भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. २०२२मध्ये भारत जर्मनीला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने वर्तवला आहे. 

नोटाबंदीमुळे बाजारातील जवळजवळ ८६ टक्के चलन रद्द झाले असून, या निर्णयातून भारतीय अर्थव्यवस्था अद्याप पूर्णपणे सावरलेली नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार वाढल्यामुळे आता ब्रिटन जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमधील आपले स्थान गमावणार आहे. त्यामुळे भारताच्या बाबतीत हा अंदाज वर्तवला जात आहे. परंतु असे असले, तरी दरम्यानच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे, असेही नाणेनिधीने म्हटले आहे. भारतात लागू होणारा वस्तू आणि सेवाकर कायदा आधी एक एप्रिलपासून लागू होणार होता. परंतु तो आता एक जुलैपासून लागू होणार आहे. ही करप्रणाली भारतासाठी किती फायदेशीर ठरेल याबाबत देशातील अर्थतज्ज्ञ साशंक असल्याचे नाणेनिधीने म्हटले आहे. 

याव्यतिरिक्त भारतातील सध्याच्या बँकाच्या स्थितीबद्दलही नाणेनिधीने चिंता व्यक्त केली आहे. बुडीत कर्जांचे प्रमाण वाढले असून, बँका सध्या ते वसुलीच्या मागे असून त्यामुळे नवीन कर्ज देण्यासाठी बँका प्रयत्नशील नसल्याचेही म्हटले आहे. यामुळे गुंतवणूक क्षेत्रातील आव्हाने वाढली आहेत, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या अहवालात म्हटले आहे.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search