Next
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘सी-ब्रीज’चे उद्घाटन
प्रेस रिलीज
Wednesday, October 17, 2018 | 12:54 PM
15 0 0
Share this article:पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (एसपीपीयू) स्थापन करण्यात आलेल्या ‘इन्क्युबेशन सेंटर’च्या उपक्रमांना १५ ऑक्टोबर २०१८ पासून सुरूवात झाली. यानिमित्त कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते सेंटरच्या ‘सी-ब्रीज’ पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले.

विद्यापीठात ‘सेंटर फॉर इनोवेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस’तर्फे (आयआयएल) नाविन्यपूर्ण अशा निवडक कल्पनांना बळ देऊन त्यांचे व्यवसाय व उद्योगांमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत केली जाणार आहे. ही संधी विद्यार्थी व माजी विद्यार्थी, विद्यापीठातील अध्यापक,  विद्यापीठाशी विविध संशोधन व विकास प्रकल्पात सहभागी असलेल्या संस्था व कंपन्या, ग्रास रूट इनोवेटर्स आणि  अस्तित्वातील कंपन्यांना नवा पुढाकार सुरू करायचा असल्यास त्यांना मिळणार आहे.

याद्वारे नाविन्यपूर्ण अशा निवडक प्रस्तावांसाठी १८ महिने पायाभूत सुविधा, व्यवसाय उभारण्यासाठी लागणाऱ्या सेवा तसेच, मेंटॉरशीप उपलब्ध करून दिले जाणार आहे. यापैकी निवडक कल्पनांसाठी सुरुवातीचे भांडवलही उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी तंत्रज्ञान व सामाजिक विषयांशी संबंधित संकल्पनांचा विचार केला जाणार आहे.

या सेंटरच्या उपक्रमांचे कुलगुरू प्रो. डॉ. करमळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले वेब पोर्टलचे अनावरणही करण्यात आले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, इक्युबेशन सेटरच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, सल्लागार समितीचे सदस्य डॉ. सुभाष घैसास, डॉ. सुरेश गोसावी, डॉ. अविनाश कुंभार व विद्यार्थी उपस्थित होते.

‘या पोर्टलद्वारे नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पना असलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी विविध पाच गटांतून प्रस्ताव मागविण्यात येणार आहे. त्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची तारीख १४ नोव्हेंबर २०१८ ही आहे. यानंतरही पुढच्या काळात नवे प्रस्ताव देण्याची संधी देण्यात येईल. यासाठी आलेले प्रस्ताव प्राथमिक समितीपुढे ठेवले जातील. त्यातील निवडक प्रस्ताव तज्ज्ञांच्या समितीपुढे मांडले जातील. त्यातून निवडल्या जाणाऱ्या प्रस्तावांच्या संकल्पनांनाबळ दिले जाईल’, अशी माहिती डॉ. पालकर यांनी दिली.

‘शैक्षणिक संस्थांमध्ये ‘इन्क्युबेशन सेंटर’ असणेही काळाची गरज बनली आहे. त्याद्वारे अनेक नाविन्यापूर्ण कल्पनांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त करून देता येऊ शकेल. त्याचीच सुरूवात या इन्क्युबेशन सेंटरतर्फे करण्यात येत आहे,’ असे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी सांगितले.
 
वेबसाइट : iil.unipune.ac.in
अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. अपूर्वा पालकर- ९८५०५ ०९४५४
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search