Next
‘संगमेश्वरी’ने ‘मुंबैकरां’ना रमवले
‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’च्या मुंबईतील प्रयोगाला उत्तम प्रतिसाद
BOI
Thursday, February 14, 2019 | 04:14 PM
15 1 0
Share this article:



रत्नागिरी :
‘कोकणचा साज संगमेश्वरी बाज’ या लोकनाट्याचा पहिला व्यावसायिक प्रयोग नुकताच मुंबईत परळमध्ये पार पडला. त्याला चाकरमान्यांनी हशा, टाळ्या आणि शिट्ट्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. नांदीपासून भैरवीपर्यंत प्रेक्षकांनी नाट्यगृह अक्षरशः डोक्यावर घेतले. कोकणच्या लोककला आणि विनोदी स्किटच्या सादरीकरणातून कोकणातील व्यथाही रसिकांना अंतर्मुख करून गेल्या.

देवघर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील गिरीश बोंद्रे आणि आनंद बोंद्रे यांची मूळ संकल्पना असलेल्या या संपूर्णपणे संगमेश्व.री बोलीतील असलेल्या लोकनाट्याची निर्मिती समर्थकृपा प्रॉडक्शनने केली आहे. मुख्य सूत्रधार सुनील बेंडखळे आणि प्रभाकर डाऊल, सचिन काळे, योगेश बांडागळे, रवींद्र गोनबरे यांनी कोकणात विविध ठिकाणी भेटणारे एकेक इरसाल नमुने पेश केले. पिंट्या चव्हाण यांनी तितक्याच ताकदीने ‘मुंबैकर’ सादर केला. यांच्या समवेत विश्वाेस सनगरे, अंकुश तांदळे, स्वप्नील सुर्वे, अनिकेत गोनबरे, राहुल कापडी, राज आणि केतन शिंदे, अभिषेक सावंत या पात्रांनीही विनोदी संवादांची पखरण करत चाकरमान्यांना लोटपोट हसायला लावले. रुद्र बांडागळे या बालकलाकाराने साकारलेला ‘बाळकृष्ण’ भाव खाऊन गेला. जाखडी, नमनातील गाण्यांनी रसिकांना ठेका धरायला लावले. अनेक गाण्यांना ‘वन्समोअर’ची दादही मिळाली. अस्सल पारंपरिक गाण्यांना मंगेश मोरे (सिंथेसायझर), मंगेश चव्हाण (ढोलकी-पखवाज) आणि अभिषेक भालेकर (तबला) यांनी संगीतसाज चढवला. त्यांना सुरेंद्र गुडेकर (ध्वनिसंयोजन), अनिकेत गानू (प्रकाशयोजना) आणि नरेश पांचाळ (रंगभूषा) यांचीही उत्तम साथ लाभली.

समारोपात तात्या गावकराने (सुनील बेंडखळे) कोकणाच्या व्यथाही मांडल्या. मानवी स्वभावावर, प्रवृत्तीवर चिमटे काढत पैसा कमावण्याच्या हव्यासाने कोकणाकडे पाठ फिरवणाऱ्या तरुण पिढीला ‘कोकणाकडे वळा, कोकण सुंदर आहेच, त्यातून सोनं कसं पिकवता येईल,’ हे सांगून प्रेक्षागृहाला अंतर्मुख केले. मुंबईतील धकाधकीच्या जीवनात विनोदातून मनोरंजन आणि प्रबोधन करणारे नाटक पाहून रिलॅक्स झाल्याचा आनंदही सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

‘एक सर्वोत्तम दर्जाची कलाकृती पाहायला मिळाली. ग्रामीण भागात राहणाऱ्या या कलाकारांनी विनोदातून रसिकांच्या मनाचा ठाव घेतलाय. कोकणाच्या कलाकारांचा अभिमान वाटला. लोकनाट्यातून ‘संगमेश्वरी बोली’ कोकणाचा झेंडा निश्चिरतच सर्वदूर पोहोचवेल,’ अशा शुभेच्छा सोनू निगम यांचे सुप्रसिद्ध ऱ्हिदम अॅरेंजर विजय शिवलकर यांनी दिल्या.

‘कोकणचा बाज...’च्या परळ येथील प्रयोगातील काही क्षण.
 
15 1 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 14 Days ago
It should travel to dfferent towns , as well.
0
0
मकरंद About 59 Days ago
सुनील बेंडखले व सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन
0
0

Select Language
Share Link
 
Search