Next
शहापूर युवक काँग्रेस अध्यक्षपदी अंकुश भोईर
BOI
Friday, September 14, 2018 | 11:29 AM
15 0 0
Share this article:

भिवंडी : अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या शहापूर विधानसभा मतदारसंघातील अध्यक्षपदी अंकुश रामचंद्र भोईर यांची बिनविरोध निवड झाली. या मतदारसंघातील अध्यक्षपदासाठी त्यांचा एकच अर्ज आल्याने त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले.

गेली चार वर्षे येथील युवक काँग्रेसचे अध्यक्षपद रिक्त होते. काही दिवसांपूर्वी युवक सदस्य नोंदणी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर रीतसर अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया घेण्यात आल्यानंतर शहापूर सोशल मीडियाचे अध्यक्ष आणि माजी खासदार सुरेश टावरे यांचे समर्थक अंकुश भोईर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. उल्हासनगर येथे रीतसर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर १३ सप्टेंबर २०१८ रोजी अंकुश भोईर यांची निवड घोषित करण्यात आली. त्यांची निवड झाल्यावर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष माजी खासदार सुरेश टावरे, तालुका अध्यक्ष महेश धानके, ओबीसी विभाग जिल्हा अध्यक्ष रवींद्र परटोळे, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान शेख, महिला तालुका अध्यक्ष संध्या पाटेकर, सेवादल अध्यक्ष रामचंद्र जोशी, इंटक अध्यक्ष भास्कर जाधव, पर्यावरण विभाग तालुका अध्यक्ष महेंद्र आरज आदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

‘माझ्यावर मोठी जबाबदारी असून, लवकरच युवक काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करून जास्तीत जास्त युवकांना काँग्रेससोबत जोडण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे,’ असे अंकुश भोईर यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search