Next
‘म. के. ढवळीकर श्रेष्ठ संशोधक’
प्रेस रिलीज
Thursday, March 29 | 03:16 PM
15 0 0
Share this story

डॉ. म. के. ढवळीकरमुंबई : ‘भारतीय पुरातत्त्व विद्येचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. म. के. ढवळीकर यांच्या निधनाने, संशोधनाच्या आधारे भारतीय प्राचीन इतिहासाचे वास्तव मांडणारा श्रेष्ठ संशोधक आपण गमावला आहे,’ अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी ढवळीकर यांना श्रद्धांजली अर्पण केली.

माधव भांडारी म्हणाले, ‘डॉ. म. के. ढवळीकर यांनी  सिंधू संस्कृतीचे संशोधन केले. ठिकठिकाणी केलेले उत्खनन आणि संशोधनाच्या आधारे, आर्य हे भारतात बाहेरून आले असल्याचा समज त्यांनी खोडून काढला व आर्य हे मूळचे भारतातीलच असल्याचे दाखवून दिले. तसेच, भारतीय संस्कृतीचा भारताबाहेर आशिया आणि त्यापलिकडे असलेला प्रभाव त्यांनी संशोधनातून दाखवून दिला होता. त्यांनी लिहिलेल्या  ‘द आर्यन्स : मिथ अँड आर्किओलॉजी’, ‘कल्चरल इम्पिरीॲलिझम: इंड्स सिव्हिलायझेशन इन वेस्टर्न इंडिया’ आदी ग्रंथांमधून त्यांच्या संशोधनाच्या श्रेष्ठतेची व विद्वत्तेची साक्ष पटते. भारतीय जनता पार्टीतर्फे आपण त्यांना श्रद्धांजली वाहतो.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link