Next
‘स्टार प्रवाह’वर नवी मालिका ‘छत्रीवाली’
प्रेस रिलीज
Monday, June 11 | 04:16 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘स्टार प्रवाह’ने आजवर आपल्या मालिकांतून वेगवेगळी कथानके सादर केली आहेत. उत्तम कलाकार, दर्जेदार निर्मितीमूल्ये आणि नवा आशय मांडणारी गोष्ट हे ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांचे वैशिष्ट्य आहे. ‘छत्रीवाली’ या मालिकेच्या माध्यमातून असाच एक वेगळा विषय घेऊन ‘स्टार प्रवाह’ प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे.

ही मालिका १८ जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही गोष्ट आहे आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या मधुराची, तर तिकडे जबाबदारीचे भान नसलेला, लाडात वाढलेला मधुराच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आणि तिच्या साधेपणाची सतत टिंगल उडवणारा विक्रम. योगायोगाने विक्रमच्याच ऑफिसमध्ये मधुराणीला जॉबची ऑफर मिळते. आपल्या तालावर मधुराणीला नाचवू पाहणाऱ्या विक्रमला मधुराणी शरण जाते की त्यालाच सरळ करते, नात्याच्या छत्रीखाली या दोघांचे नाते बहरते का अशा अनेक प्रश्नांची उत्तर ‘छत्रीवाली’ मालिकेदरम्यान मिळणार आहेत.

मालिकेत संकेत पाठक आणि नम्रता प्रधान ही नवी जोडी पहायला मिळणार आहे. संकेत पाठकने या पूर्वी ‘स्टार प्रवाह’च्याच ‘दुहेरी’ या लोकप्रिय मालिकेत दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारली होती, तर नम्रताची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या प्रोमोजनी सोशल मीडियामध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
  Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link