Next
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोल माफ
BOI
Thursday, August 29, 2019 | 06:15 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई- कोल्हापूरमार्गे खासगी वाहनांनी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना ३० ऑगस्ट ते १२ सप्टेंबर २०१९ पर्यंत टोल माफ करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. ही सवलत मिळवण्यासाठी वाहनचालकांनी आपल्या नजीकच्या पोलीस स्थानकातून टोल पास घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

कोकणात जाणाऱ्या रस्त्यांच्या स्थितीबाबत नुकतीच बैठक महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात झाली होती. या बैठकीत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास आणखी सुखकर व्हावा टोल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासंबंधीचा शासन निर्णय गुरुवारी (२९ ऑगस्ट) सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला. 

गणेशोत्सवासाठी मुंबई-पुणे-कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या भाविकांना एक स्टिकर पास देण्यात येणार आहेत. हा पास १२ सप्टेंबर रोजी परतीच्या प्रवासात ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच,  मुंबई-पुणे प्रवासात व पुणे- कोल्हापूर कागल मार्गे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई (वाशी), पुणे-मुंबई एक्सप्रेस वे, किणी, ताथवडे येथील पथकर नाक्यांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search