Next
पिंपरी येथे स्तन कर्करोगाविषयी परिषद उत्साहात
प्रेस रिलीज
Monday, August 06, 2018 | 11:22 AM
15 0 0
Share this story

परिषदेचे उद्घाटन करताना अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर. शेजारी (उजवीकडे) डॉ. एन. जे. पवार, (डावीकडून) डॉ. वत्सला स्वामी, डॉ. अमरजित सिंग, डॉ. एस. जी. गंदगे, डॉ. प्रतीक्षा यादव आणि मान्यवर.

पिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रेडिओ डायग्नोसिस विभाग व ब्रेस्ट इमेजिंग सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालात स्तन कर्करोगाविषयी परिषदेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.

स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण शहरी व निमशहरी भागातील स्त्रियांमध्ये सर्वाधिक आहे. भारतात या कर्करोगाचे प्रमाण तीस व चाळीशीच्या तरुणींमध्ये दिसून येत आहे; तसेच स्तन कर्करोगाविषयी सामाजिक जागरूकता गरजेची आहे. त्या अनुषंगाने स्तनासंदर्भातील विकार दूर करण्यासाठी सर्वसमावेशक वैद्यकीय उपलब्धी सर्वांपुढे मांडण्याच्या हेतूने ही परिषद घेण्यात आली.

या परिषदेत स्तन कर्करोगाविषयी नवनवीन संशोधन,  उपचार पद्धती, शस्त्रक्रिया, स्तन कर्करोगाचे योग्य निदान व्हावे यासाठी उपलब्ध वैद्यकीय चिकित्सा यंत्रणा, आधुनिकी वैद्यकीय तंत्रज्ञानाचा योग्य वापर, तसेच अचूक निदान व्हावे यासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन आणि स्तन कर्करोगांमधील निदानात्मक सुविधा सुधारण्यासाठी भर देण्याबरोबर गुणवत्ता वाढवणे, समाजामध्ये स्तन कर्करोगाबद्दल जागरूकता करणे, प्रतिबंधात्मक तपासणीवर भर देणे, पिडीत रुग्णाचे जीवनमान वाढवण्यासाठी औषधोपचार आदी विषयांवर तज्ज्ञांनी व्याख्यान दिले. डिजिटल मॅमोग्राफी, अल्ट्रासाउंड ब्रेस्ट, स्तन एमआरआय, बायोप्सी, टोमॉसिन्थेसिस याबाबत मार्गदर्शन करण्यात आले डॉ. वर्षा हरदास, डॉ. सबिता देसाई, डॉ. सुभाष रमाणी, डॉ. राजू वाधवानी, डॉ. प्रतीक्षा यादव यांनी या परिषदेला संबोधित केले.

हा कार्यक्रम कुलपती डॉ. पी. डी. पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे शैक्षणिक संचालक डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमरजित सिंग, अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, परिषदेचे आयोजक डॉ. एस. जी. गंदगे, सचिव डॉ. प्रतीक्षा यादव यांसह राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील रेडिओलॉजिस्ट, शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे ११० विद्यार्थी उपस्थित होते.

डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात सर्व महिलांसाठी प्रतिबंधात्मक स्तन कर्करोगाची मॅमोग्राफी तपासणी विनामूल्य उपलब्ध असून, महिलांनी ही तपासणी करून घ्यावी असे आवाहन रेडिओ डायग्नोसिस विभागातर्फे करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रेडिओ डायग्नोसिस विभागाने परिश्रम घेतले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link