Next
शिवसेनेतर्फे हिमायतनगरात शिवनेरी शेतकरी पीकविमा मदत केंद्र सुरू
नागेश शिंदे
Saturday, June 29, 2019 | 06:03 PM
15 0 0
Share this article:

नागेश पाटील-आष्टीकरहिमायतनगर : ‘हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा पीकविमा मिळाला नसेल किंवा त्या संदर्भात अजून काही तक्रारी असतील, तर त्यांनी हिमायतनगर येथील तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे यांच्या निवासस्थानी सुरू करण्यात आलेल्या शिवनेरी शेतकरी पीकविमा मदत केंद्राशी संपर्क साधावा,’ असे आवान हदगाव-हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी केले आहे.

मागील वर्षी सोयाबीन पिकाचा पीकविमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही तो मिळाला नाही. पेरण्या झाल्यानंतर पावसाची उघडीप झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. जमिनीत ओल नसल्यामुळे रब्बीचे पीकही शेतकऱ्यांना घेता आले नाही. शेतकऱ्यांना पीकविमाही अजून मिळालेला नाही.

त्यामुळे हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील शेतकऱ्यांना मागील वर्षाचा पीकविमा तात्काळ मिळावा या हेतूने आमदार नागेश पाटील-आष्टीकर प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांनी पीकविम्यासंदर्भातील तक्रारी हिमायतनगर येथील तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, युवा सेना तालुकाप्रमुख विशाल राठोड, उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे, शहरप्रमुख प्रकाश रामदिनवार यांच्याशी संपर्क साधून नोंदवाव्यात. शिवसेनेच्या वतीने हिमायतनगर शहरात शिवनेरी शेतकरी पीकविमा मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रावरही तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Lumde Bhimarao Tukaram About 107 Days ago
Soyabin crop insurance milalela nahi
0
0
Lumde Bhimarao Tukaram About 107 Days ago
Soyabin pikvima milala nahi
0
0

Select Language
Share Link
 
Search