Next
माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे मतदार जागृती मोहीम
BOI
Thursday, April 04, 2019 | 03:55 PM
15 0 0
Share this article:


पुणे : मतदारांना जागृत करून मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राज्यात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ‘रिजनल आउटरीच ब्यूरो’द्वारे महा मतदार जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. नवी दिल्लीचे ‘ब्यूरो ऑफ आउटरीच कम्युनिकेशन’चे महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांनी नुकतीच याबाबत माहिती दिली.

मतदार जनजागृती मोहिमेंतर्गत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘फिरते चित्रवाहन’ या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली. ‘पुणे जिल्ह्यात स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ७० टक्यांहून अधिक मतदान व्हावे, यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. रीजनल आउटरीच ब्यूरोद्वारे हाती घेण्यात आलेल्या मोहिमेद्वारे मतदानाची टक्केवारी वाढवण्यास नक्कीच मदत हाईल, असा विश्वास सत्येंद्र प्रकाश यांनी या वेळी व्यक्त केला. 

या प्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पत्र सूचना कार्यालय व रिजनल आउटरीच ब्यूरोचे अतिरिक्त महासंचालक डी. जे. नारायण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग, पुणे रीजनल आउटरीच ब्यूरोचे संचालक संतोष अजमेरा, स्वीपचे समन्वयक सुभाष बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचा शुभारंभ महासंचालक सत्येंद्र प्रकाश व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी फित कापून व हवेत फुगे सोडून केला. राज्यातील जिल्ह्यांमध्ये या जनजागृती मोहिमेस प्रारंभ झाला असून सांस्कृतिक कार्यक्रम, नाटिका, संगीत अशा वेगवेगळया कार्यक्रमांच्या माध्यमातून राबवल्या जात असलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search