Next
‘आर्म्ड फोर्सेस’ कॉलेजचे यश
प्रेस रिलीज
Saturday, February 17 | 06:32 PM
15 0 0
Share this story

पुणे : अर्णब सेनगुप्ता आणि अनिरुद्ध अनिल कुमार या आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजमधील जोडीने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना नमवत टाटा क्रुसिबल कँप्स क्विझ २०१८च्या पुणे आवृत्तीचे विजेतेपद पटकावले.

पुण्यातील बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ टेलिकॉम अँड मॅनेजमेंट अर्थात बीआयटीएममध्ये झालेल्या शहर पातळीवरील अंतिम फेरीमध्ये एकूण १५८ संघ सहभागी झाले होते. अर्णब आणि अनिरुद्ध यांनी विजेत्यांना दिले जाणारे ७५ हजारांचे रोख पारितोषिक प्राप्त केले. हे दोघे राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी आता विभागीय फेर्‍यांमध्ये सहभागी होतील.

सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मिडिया अँड कम्युनिकेशनचे स्टॅनी डेव्हिस आणि विजयदीप शुक्ला हे दोघे उपविजेते ठरले. त्यांना ३५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. बालाजी सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष तसेच बीआयटीएमचे डीन डॉ. (कर्नल) ए. बालासुब्रमणियन अंतिम फेरीत प्रमुख आतिथी म्हणून उपस्थित होते.

टाटा समूहाचे १५०वे वर्ष साजरे करण्यासाठी यंदाच्या प्रश्नमंजुषेचा विषय टाटा समूहाच्या १५० वर्षांतील व्यवसायांभोवती फिरणारा होता. या प्रश्नमंजूषेच्या परंपरेप्रमाणे, प्रख्यात क्विझमास्टर ‘पिकब्रेन’ गिरी बालसुब्रमणियम यांनी त्यांचे नेहमीचे प्रभुत्व दाखवत, प्रश्नांना विनोदाची जोड देणार्‍या असाधारण शैलीत प्रश्नमंजूषेचे सूत्रसंचालन सांभाळले.

भारतातील सर्वांत मोठ्या कँपस क्विझचे हे १४वे वर्ष असून, ही स्पर्धा दोन महिन्यांहून अधिक काळ, ३८ शहरांमध्ये, पाच विभागीय फेर्‍या आणि त्यानंतर मुंबईत होणारी अंतिम फेरी अशा टप्प्यांत होणार आहे. राष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांना पाच लाख रोख व सोबतीला प्रतिष्ठेचा टाटा क्रुसिबल चषक असे मोठे बक्षीस दिले जाणार आहे. या स्पर्धेतील पारितोषिके फास्टट्रॅक आणि टाटा मोटर्स यांनी प्रायोजित केली आहेत.

अधिक माहितीसाठी वेबसाइट : www.tatacrucible.com
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link