Next
‘आयटेल’च्या ऑफरमध्ये निझानुद्दिन यांनी जिंकली बाइक
प्रेस रिलीज
Tuesday, October 23, 2018 | 12:35 PM
15 0 0
Share this article:

आयटेल फेस्टिव्ह बोनान्झा ऑफरचे पहिले विजेते निझानुद्दिन यांना मोटरबाइक भेट म्हणून देताना महाराष्ट्र आणि गुजरातचे आयएसएम जितेंदर चंधा आणि टीममुंबई : आयटेल या ट्रॅन्शन होल्डिंग्सच्या अग्रेसर ब्रॅंडतर्फे यंदाच्या सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी खास मेगा फेस्टिव्ह बोनान्झा ऑफर सादर करण्यात आली आहे. १० ऑक्टोबरला झालेली ही ऑफर १३ नोव्हेंबर २०१८पर्यंत सुरू राहणार आहे.

देशात चार कोटींहून अधिक ग्राहक जोडल्याचे सेलिब्रेशन म्हणून ही ऑफर सादर करण्यात आली आहे. केवळ तीन वर्षांच्या कालावधीत आयटेलने हे यश प्राप्त केले आहे. निझानुद्दिन यांचे नाव या ऑफरअंतर्गत डेली बंपर प्राइजचे पहिले विजेते म्हणून जाहीर करण्यात आले. त्यांना टीव्हीएस मोटरबाइक बक्षीस देण्यात आली.

ट्रॅन्शन इंडियाचे सीईओ अरिजित तालपत्रा म्हणाले, ‘आयटेल ब्रॅंडसाठी ग्राहकांचा आनंद ही सर्वांत प्राधान्याची गोष्ट आहे आणि याच हेतूसाठी आम्ही १० ऑक्टोबरपासून भारतभर मेगा फेस्टिव्ह बोनान्झा ऑफर सादर केली आहे. आयटेल स्मार्टफोन विकत घेऊन आकर्षक मोटरबाइक जिंकल्याबद्दल आणि आपले स्वप्न साकार केल्याबद्दल आम्ही निझानुद्दिन यांचे अभिनंदन करतो. भारतातील सर्वच क्षेत्रांसाठी फेस्टिव्ह सिझन हा खास असतो. कारण, हे क्षण आपण आपल्या मित्रपरिवारासह आणि कुटुंबियांसह साजरे करत असतो. ग्राहकांना प्रत्येक आयटेल स्मार्टफोनच्या खरेदीवर सोन्याची नाणी, मोटरबाइक ही बक्षीसे दररोज जिंकण्याची संधी मिळणार आहे.’

‘भारतभर ही ऑफर १३ नोव्हेंबरपर्यंत सुरू आहे. या ३५ दिवसांच्या कालावधीत आयटेल स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. १० सोन्याची नाणी आणि एक मोटरबाइक ही दोन दैनंदिन बक्षिसे देण्यात येणार असून, ऑफर प्रमोशन कालावधीच्या शेवटी एक कार जॅकपॉट बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. ग्राहकांचा फेस्टिव्ह सीझन खास अविस्मरणीय होण्यासाठी ३५० सोन्याची नाणी, ३५ मोटरबाइक्स आणि एक कार ही बक्षिसे या कालावधीत देण्यात येणार आहे,’ असे तालपत्रा यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search