Next
‘शास्त्रीय संगीत टिकविण्यासाठी गुरुकुल पद्धती हक्काचे माध्यम’
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Saturday, February 02, 2019 | 04:34 PM
15 0 0
Share this article:पुणे : ‘शास्त्रीय संगीत हे जगातील सर्वोत्तम संगीत आहे, त्याची महती आपल्या पुढच्या पिढीला हस्तांतरीत करणे ही आपली जाबाबदारी आहे. शास्त्रीय संगीताची पुढील पिढीमध्ये ओळख करून देण्यासह रुजविणे आवश्यक आहे. यातूनच शास्त्रीय संगीत चिरंतर काळ टिकविता येईल. यासाठी गुरुकुल पद्धती एक हक्काचे माध्यम असून, आपल्या मुलांना याद्वारे शास्त्रीय संगीताशी जोडता येऊ शकेल,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी केले.  

संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांनी आयडियल कॉलनी येथील मैदानावर कोथरूड सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले होते. यात आरती अंकलीकर-टिकेकर यांना ज्येष्ठ सतारवादक उस्ताद उस्मान खान यांच्या हस्ते संस्कृती कला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रवींद्र वंजारवाडकर, माजी नगरसेविका मोनिका मोहोळ, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, श्रद्धा प्रभुणे, दिलीप वेडे-पाटील, ‘संवाद पुणे’चे सुनील महाजन, निकिता मोघे, बढेकर ग्रुपचे प्रवीण बढेकर, लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे सुशील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

ग. दि. माडगुळकर (गदिमा), सुधीर फडके (बाबूजी) आणि पु. ल. देशपांडे (पुलं) यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने ‘स्वरत्रिवेणी’ या कार्यक्रमाचे आयोजन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करण्यात आले होते. यामध्ये ज्येष्ठ संगीतकार श्रीधर फडके, आनंद माडगुळकर, अतुल परचुरे आदी कलाकार सहभागी झाले. ‘गदिमा’ आणि ‘बाबूजीं’ची सुरेल गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना गायनात गायिका शिल्पा पुणतांबेकर, शेफाली कुलकर्णी-साकुरीकर यांनी स्वरसाथ दिली, तर ‘गदिमा यांचे’ पुत्र आनंद माडगुळकर यांनी गदिमा–बाबूजींच्या आठवणींची शिदोरी उलगडली.

अभिनेते अतुल परचुरे यांनी ‘पुलं’च्या साहित्याचे अभिवाचन केले. त्यांनी आपल्या अभिवाचनातील खुमासदार शैलीत ‘पुलं’ रसिकांसमोर उभे केले. एकाच व्यासपीठावर ‘गदिमा’, ‘बाबूजी’ आणि ‘पुलं’ या तीन दिग्गजांची जीवनप्रवास गप्पा, गाणी आणि अभिवाचनातून पुणेकरांनी अनुभवला. ‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना’, ‘सखी मंद झाल्या तारका’, ‘फिटे अंधाराचे जाळे’ अशी एकापेक्षा एक सुरेल गाणी श्रीधर फडके यांनी सादर केली, तर आरती अंकलीकर- टिकेकर यांनी ‘मी राधिका, मी प्रेमिका’ हे गीत सादर करत रसिकांची मने जिंकली. त्यांना अतुल माळी (सिंथेसायझर), तुषार आग्रे (तबला), आदित्य आपटे (साइड ऱ्हिदम), नीलेश देशपांडे (बासरी) आणि गौरी संगळ व राहुल कुलकर्णी (कोरस) यांनी साथ दिली.आरती म्हणाल्या, ‘कोथरूडमध्ये माझे गुरुकुल असून, अनेक शिष्या येथे गायनाचे धडे गिरवत आहेत. मी नेहमीच शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी प्रयत्नशील आहे. मिळणारा प्रत्येक पुरस्कार हा मला त्यासाठी प्रेरणा देतो. यातूनच मला शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी बळ मिळते.’

संगीतकार फडके म्हणाले, ‘‘गदिमा’ व ‘बाबूजीं’नी अप्रतिम गाणी रचली. त्यांचा प्रत्येक गाण्यात वेगवेगळे संगीत रसिकांना अनुभवायला मिळाले. त्यांच्या प्रत्येक रचनेत वेगळेपण त्यामुळे ते रसिकांना भावले.’

माडगुळकर म्हणाले, ‘‘गदिमा’ आणि ‘बाबूजी’ यांच्यात बरेच मतभेद होते; परंतु मतभेद विसरून ते संगीतासाठी एकत्र येत. त्यातून अस्सल गाणी रचली जात आणि त्याला रसिकांची दाद मिळे. याच विलक्षण विश्वासामुळे ही जोडी आजही आपल्या मनावर राज्य करते.’

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुकन्या जोशी व मोनिका जोशी यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search