Next
‘घातसूत्र’चे दीपक करंजीकर रत्नागिरीकरांच्या भेटीला
रत्नागिरी नगर वाचनालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Wednesday, April 03, 2019 | 11:20 AM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : जिल्हा नगर वाचनालयातर्फे आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमात ‘घातसूत्र’ या कादंबरीचे लेखक दीपक करंजीकर रत्नागिरीकरांच्या भेटीला येणार आहेत. हा कार्यक्रम आठ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी सहा वाजता नगर वाचनालयाच्या सभागृहात होईल.

‘घातसूत्र’ ही कादंबरी किंवा इतिहास नाही. सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. अनेकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. मात्र ‘घातसूत्र’ वाचल्यावर लक्षात येते, की प्रत्यक्षात युद्ध हा एक व्यापाराचा फार मोठा भाग आहे. युद्ध खेळवली जातात. जगाचे फार मोठे आर्थिक राजकारण या युद्धाशी जोडलेले आहे. पहिले महायुद्ध व दुसरे महायुद्ध खेळवली गेलेली आहेत. यांचे खेळणारे खेळिया हे वेगळेच आहेत. त्यांना आर्थिक नफेखोरी करण्याच्या सोबतच संपूर्ण जग म्हणजे ‘एक राष्ट्र’ या सूत्राने बांधा बांधायचे आहे. हे सूत्रधार निर्दयी, क्रूर, घातक आणि धूर्त आहेत. आपल्या हव्यासासाठी कुठल्याही स्तरावर जाण्याची त्यांची तयारी आहे.

‘फेडरल रिझर्व बँक’ ही अमेरिकेची सर्वोच्च बँक असली, तरी ती त्या देशाची राष्ट्रीय बँक नाही. या बँकेच्या चलनामध्ये कुठेही ‘आय प्रॉमिस टू पे’ असे नमूद केलेले नाही. या बँकेची स्थापना टायटॅनिक नावाची बोट बुडाल्यानंतर झालेली आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. टायटॅनिक बुडाली की बुडवली, ९/११ला अमेरिकेमध्ये ट्विन टॉवरवर झालेला हल्ला लादेन किंवा अरबांनी केला असा समज सर्वत्र पसरवला गेला; पण प्रत्यक्षात कुठल्याही विमानतळावर एकही अरब विमान दाखल झाल्याची नोंद नाही. १०७ मजल्यांचा ट्विन टॉवर प्रत्यक्ष पत्त्यासारखा कसा कोसळू शकतो, त्यासाठी आवश्यक असणारी उष्णता निर्माण करण्याचे सामर्थ्य विमानात असलेल्या पेट्रोलच्या अंगी मुळीच नव्हते. आज दलाल स्ट्रीटवर होणारे आर्थिक व्यवहार हे हवेतून निर्माण केलेले चलन आहे. या आणि अशा अनेक गोष्टींचा वेधक शोध लेखक करंजीकर यांनी त्यांच्या नुकत्याच लिहिलेल्या ‘घातसूत्र’ या पुस्तकात घेतला आहे.

करंजीकर हे सुप्रसिद्ध अभिनेते असून, त्यांनी आतापर्यंत मराठी नाटके, टीव्ही मालिकांसोबतच मराठी, हिंदी व इंग्रजी चित्रपटात काम केले आहे. ते संगणक, अर्थशास्त्र व व्यवस्थापनतज्ज्ञ, तसेच प्रथितयश लेखकही आहेत. त्याचबरोबर केंद्र शासनाच्या रेल्वे, आर्थिक नियोजन, संगीत नाटक अकादमी, सांस्कृतिक, नाट्य, अशा अनेक समित्यांवर कार्यरत आहेत. करंजीकर यांनी अभ्यासपूर्ण लिहिलेले ‘घातसूत्र’ हे पुस्तक सध्या प्रचंड गाजत आहे. अवघ्या एका महिन्यात या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या संपलेल्या आहेत. यातील विषय हे वाचकांना थक्क करणारे आहेत. १०४ वर्षांचा इतिहास त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी या व्याख्यानाच्या निमित्ताने रत्नागिरीकरांना उपलब्ध झाली आहे. वाचकांनी मोठ्या संख्येने व्याख्यानासाठी उपस्थित राहाण्याचे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.

(‘घातसूत्र’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search