Next
साडेतीनशे महिलांनी पायांनी रंगवले भव्य चित्र
महिला दिनानिमित्त पॅव्हिलियनमध्ये अनोखा उपक्रम
BOI
Saturday, March 09, 2019 | 12:34 PM
15 1 0
Share this story


पुणे : तब्बल साडेतीनशे महिलांनी एकत्र येऊन आपल्या पायांनी एक भव्य चित्र साकारले. महिला दिनानिमित्त शुक्रवारी, आठ मार्च २०१९ रोजी पॅव्हिलियन मॉलमध्ये हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. जागतिक विक्रम घडविण्याच्या दृष्टीने आयोजित या उपक्रमाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.  


विविध क्षेत्रांतील साडेतीनशे महिला एकत्र येऊन एका भल्या मोठ्या कॅनव्हासवर पायांच्या सहाय्याने विविध रंगाच्या सहाय्याने एक आकर्षक चित्र साकारत आहेत, हे दृश्यच विलक्षण देखणे होते. संपूर्ण वातावरण चैतन्यमय झाले होते. एकमेकींशी समन्वय साधून हे भव्य चित्र पूर्ण करण्यासाठी सर्व सहभागी महिला उत्साहाने प्रयत्न करत होत्या. स्त्री-शक्तीचे अनोखे दर्शन या सांघिक कृतीतून घडत होते. 

‘समानतेचा विचार करा, बदलासाठी नवीन विचार करा, स्मार्ट कृती करा’ अशी या वर्षी महिला दिनाची संकल्पना आहे. तोच संदेश या महिलांनी या उपक्रमातून दिला. 


या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तीस नामवंत महिलाही उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या यशाचे रहस्य उलगडले. आपल्या यशस्वी वाटचालीत आलेले अडथळे, त्यावर केलेली मात याबाबत त्यांनी आपले अनुभव सांगितले. महिलांच्या हक्कांसाठी पुढे येण्याचे, प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. 


या वेळी या उपक्रमाचे आयोजक मॉलचे सेंटर डायरेक्टर राहील अजनी म्हणाले, ‘जगाला घडविणारी शक्ती म्हणजे स्त्री आहे. महिला त्यांचे कुटुंब, मित्र परिवार, त्यांच्या आजूबाजूला असलेल्या माणसांचा आधारस्तंभ असतात. आज वेगवेगळ्या क्षेत्रात आपले अस्तित्व, आपले अव्वल स्थान निर्माण करणाऱ्या स्त्रियांना मानाचा मुजरा. महिला दिनानिमित्त स्त्री शक्तीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम आयोजित करताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटला. स्त्री शक्तीचा गौरव करण्याची ही प्रथा पॅव्हिलियन मॉल यापुढेही कायम ठेवेल.’ 
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link