Next
डीकेटीईचे प्रा. मंजुनाथ बुर्जी यांना पीएच.डी.
प्रेस रिलीज
Wednesday, August 29, 2018 | 06:27 PM
15 0 0
Share this article:

प्रा. मंजूनाथ बुर्जी
इचलकरंजी : येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल अॅं ड इंजिनीअरिंग इन्स्टिटयूटमध्ये गेली १६ वर्षे कार्यरत असणारे प्रा. मंजूनाथ बुर्जी यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी. इन टेक्स्टाईल इंजिनिअरींग ही पदवी प्रदान केली आहे. गेली १० वर्षे ते भारत सरकारच्या टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशनचे मॅनेजर म्हणून कार्यरत असून, या अंतर्गत त्यांनी ३० स्टार्टअप प्रोजेक्टस विकसित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 

डीकेटीई इन्स्टिटयूटचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘स्टडीज ऑन मल्टीकंम्पोनंट यार्नस मॅन्युफॅक्चर ऑन एअर कव्हरींग टेक्नॉलॉजी’ या विषयावर पीएच.डी. प्रबंध पूर्ण केला आहे. पीएच.डी. प्रबंधातर्गत त्यांनी कम्फर्ट टाईट फीट गारमेंट बनविण्यासाठी लागणाऱ्या स्पेशलाईजड यार्नसची निर्मिती केली. पीएच.डी. प्रकल्प पूर्ण करत असताना त्यांचे एकूण १६ प्रबंध प्रसिध्द झाले आहेत. प्रा. मंजूनाथ बुर्जी यांनी अमेरिकेत टेक्नॉलॉजी कमर्शियलायझेशन या विषयाचे प्रशिक्षण घेतले असून, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे एकूण ६० पेपर्स प्रसिध्द झाले आहेत. बी.टेक व एम.टेकच्या अनेक विद्यार्थ्यांनाही त्यांनी  मार्गदर्शन केले आहे. पीएच.डी. पूर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश आवाडे, मानद सचिव सपना आवाडे आणि सर्व विश्वस्तांनी त्यांचे अभिनंदन केले.  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search