Next
टपाल खात्यातर्फे घरपोच बँकिंग सेवा कार्यान्वित
BOI
Thursday, October 11, 2018 | 04:48 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : ‘टपाल सेवेचा फायदा अगदी दुर्गम भागातील ग्राहकांना मिळावा यासाठी टपाल खात्यामार्फत ‘घरपोच बँकिंग सेवा’ कार्यान्वित केली आहे. एका टोल फ्री क्रमांकावर ग्राहकांना आता घरबसल्या पोस्टमनद्वारे रक्कम हातात मिळेल,’ अशी माहिती डाकघर अधीक्षक ए. बी. कोड्डा यांनी दिली.

राष्ट्रीय टपाल सप्ताहात नऊ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधान डाकघर व संगमेश्‍वर, राजापूर, दापोली, देवरूख, उपडाकघर येथे बैठका, शालेय विद्यार्थ्यांना पोस्टाची माहिती, १० ऑक्टोबरला बँकिंग दिवस, सर्व उपविभागीय कार्यालयात बचत बँक कॅम्प, लाभार्थी व स्थानिक पंचायतीच्या प्रतिनिधींची सभा, ११ ऑक्टोबरला टपाल जीवन विमा (पीएलआय) दिवस, १२ ऑक्टोबरला फिलीटॅली दिवस, १३ ऑक्टोबरला ग्राहक मेळावा, १५ ऑक्टोबरला मेल दिवस, शालेय विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन पत्रलेखन, पत्ता लिहिणे, पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्राच्या वापराबद्दल माहिती देण्यात येईल.

जिल्ह्यात १८५४ टपाल सेवा सुरू झाली. टपाल खात्याच्या जिल्ह्यात ५८४ शाखा डाकघर, ७७ उप डाकघर, दोन प्रधान डाकघर असून, बाराशे कर्मचारी अधिकारी सेवा देत आहेत. टपाल खात्यातून ग्राहकांसाठी विविध सेवा देताना १२ ऑगस्टला रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी राजापूर येथे पासपोर्ट सेवा सुरू केली. त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. दिवसाला ३० पासपोर्ट तयार केले जात असून, आजतागायत दोन हजार ग्राहकांना लाभ झाला.

‘संपर्काचे साधन हा जागतिकीकरणाचा आत्मा आहे. मोबाइल, इंटरनेटसारख्या आणखी कितीतरी इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे ग्रामीण दुर्गम भागातही टपाल खात्याची माहिती पोचविण्याचे काम सुरू आहे. ऑनलाइन सेवा सुरू झाल्यानंतर टपाल खात्याने अनेक उपक्रम राबविले आहे. तालुक्यातील वाटद, सैतवडा, भाट्ये, सोमेश्‍वर या ठिकाणी पोस्ट पेमेंट बँकेची सुविधा सुरू करण्यात आली आहे. गोव्यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी या जिल्ह्यांतील ग्रामीण दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी वीज पुरवठा नाही, त्या सर्व्हेचे काम शासनाने टपाल खात्याला दिले आहे. यासंदर्भात १५ ऑक्टोबरला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्राहकांच्या संपर्कातील सेवेतील एका दुव्यातील काम मिळाले आहे,’ असे डाकघर अधीक्षक कोड्डा यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search