Next
‘होंडा टू-व्हीलर्स’च्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप
प्रेस रिलीज
Wednesday, February 13, 2019 | 11:24 AM
15 0 0
Share this article:पुणे : कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या (सीएसआर) उपक्रमांतर्गत, होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडतर्फे चार ते १० फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आयोजित केलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचा समारोप नुकताच करण्यात आला. ‘सडक सुरक्षा, जीवन रक्षा’ या संकल्पनेवर आधारीत हा उपक्रम रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने आयोजित केला होता.  

पुण्यामध्ये ‘होंडा’च्या रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमेमध्ये तीन हजारांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. यात महिलांचा सहभागही लक्षणीय होता. राष्ट्रीय स्तरावर ‘होंडा’ने या उपक्रमामध्ये ३३ हजार मुले व महिलांना सहभागी करून घेतले होते. ‘होंडा’च्या या रस्ता सुरक्षाविषयक जागरूकता प्रसार मोहिमेला अनेक राज्यांचे पोलिस विभाग, महानगरपालिका, प्रादेशिक परिवहन संस्था (आरटीओ), स्वयंसेवी संघटना, तसेच शाळांनी पाठबळ दिले.

या ३०व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहामध्ये रस्ता सुरक्षा जागरूकता कशी वाढवली, यावर बोलताना ‘होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया’चे ब्रॅंड व कम्युनिकेशन विभागाचे उपाध्यक्ष प्रभू नागराज म्हणाले, ‘रस्त्यांवरील सुरक्षा हा राष्ट्रीय चिंतेचा विषय आहे. रस्त्यांवरील अपघातांमुळे दरवर्षी १.४७ लाख लोक आपले आयुष्य गमावतात. नागरी प्रशासन याबाबत विविध उपाययोजना करीत असले, तरी एक सामाजिक जबाबदारी म्हणून ‘होंडा’नेदखील राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने ‘रस्त्यांवरील सुरक्षितता’ यावरील संदेश प्रसारीत करण्यासाठी पुढाकार घेतला.’

‘प्रत्येकजण सुरक्षित राहावा, हे उद्दिष्ट समोर ठेवून, आम्ही शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटांतील नागरिकांना, आमच्या ग्राहकांना, तसेच आमच्या पाच हजार ८०० केंद्रांमधील सहकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. भविष्यातही, आम्ही राष्ट्रीय रस्ता सुरक्षा जागरूकता मोहिमेच्या माध्यमातून शहरांतील लोकांना संवेदनशील बनविणार आहोत,’ असे नागराज यांनी सांगितले.

‘होंडा’तर्फे आठवडाभर चाललेल्या रस्ता सुरक्षा उपक्रमातील प्रमुख असे : महानगरांच्या बरोबरीने ‘होंडा’ने पानिपत (हरियाणा), हावडा (पश्चिम बंगाल), अलेप्पी (केरळ), अलवर (राजस्थान) आदींसह देशातील विविध शहरांमध्ये रस्ता सुरक्षा जागरूकतेचा प्रसार केला. ‘होंडा’च्या देशभरातील नेटवर्कमधील पाच हजार ८०० केंद्रांमध्ये ग्राहक आणि २२ हजारांहून अधिक सहकाऱ्यांनी रस्ता सुरक्षाविषयक प्रतिज्ञा घेतली. संपूर्ण भारतात ‘होंडा’तर्फे आयोजित १३ वाहतूक प्रशिक्षण शिबिरांमध्ये सुमारे १७ हजार लोकांना रस्ता सुरक्षाविषयी शिक्षित करण्यात आले. ‘सुरक्षितपणे गाडी चालविणे’ ही संकल्पना महिलांसाठी रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून प्रसारीत करण्यात आली; तसेच पोस्टर बनविणे, चित्रकला यांच्या स्पर्धांच्या माध्यमातून मुलांना जागरूक करण्यात आले.

‘होंडा’च्या राष्ट्रव्यापी रस्ते सुरक्षा जागरूकता मोहिमेअंतर्गत नऊ शहरांमधील १३९ शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थी, तसेच एक हजार महिलांनी रस्ता सुरक्षेविषयी मनोरंजनात्मक पद्धतीने माहिती घेतली. ‘होंडा’ व तिच्या वितरकांनी अनेक शहरांमध्ये रस्ता सुरक्षा जागरूकता कार्यक्रम आयोजित केले. अलेप्पी येथे स्कूटरची रॅली काढण्यात आली; तसेच शहरांमध्ये मध्यवर्ती भागांत ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले. तरुण व प्रौढांना ‘रायडिंग सिम्युलेटर’द्वारे आभासी स्वरूपात प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी पत्रके वितरीत करण्यात आली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search