Next
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतीला उजाळा
BOI
Tuesday, April 25, 2017 | 07:05 PM
15 3 0
Share this article:

उद्घाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरठाणे : राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये नुकतेच २९व्या सावरकर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या तीन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते झाले. या संमेलनाच्या निमित्त्ताने अनेक कार्यक्रमांमधून सावरकरांच्या स्मृतीला उजाळा दिला गेला. या संमेलनाला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, वैद्यकीय, शिक्षण व माहिती तंत्रज्ञान मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजन विचारे, खासदार विनय सहस्रबुद्धे, खासदार कपिल पाटील, खासदार संजय केळकर व मुंबई व ठाण्यातील आमदार उपस्थित होते.

सावरकरांच्या प्रतिमेला वंदन करताना अमित शहास्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास मंडळ, मुंबई, वि. दा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे व सावरकर दर्शन प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन आयोजित केले गेले होते. या संमेलनाचे औचित्य साधून संमेलनपूर्व कार्यक्रमांची मेजवानीही सावरकरप्रेमींना देण्यात आली. यामध्ये सावरकरांच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन, सावरकरांवरील  चित्रपट, ध्वनिफीत, दृकश्राव्य कार्यक्रम, लघुनाट्य यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 

उद्घाटनप्रसंगी बोलताना अमित शहाउद्घाटन व ग्रंथदिंडीने संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला. संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम, ‘भारताची संरक्षण सिद्धता’ या विषयावरील व्याख्यान, सावरकर आजच्या संदर्भात, सावरकरांचे साहित्यविश्व, अल्पज्ञात सावरकर, सावरकरांवरील आक्षेप व निराकरण, भारतातील समाज सुधारणा या दर्जेदार विषयांच्या व्याख्यानांची रेलचेलच होती. याशिवाय ‘अनादी मी, अनंत मी’ या नाटकाचे अभिवाचन, ‘महाकवी सावरकर’चे शरद पोंक्षे यांनी केलेले सादरीकरण या कार्यक्रमांनी संमेलन वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. संमेलनाचा समारोप समारंभही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तितक्याच उत्साहात पार पडला.



 
15 3 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search