Next
राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत वैष्णवी आडकर उपविजेती
प्रेस रिलीज
Monday, September 17 | 01:33 PM
15 0 0
Share this story

पुणे : केरळ टेनिस क्लब आणि ऑल इंडिया टेनिस असोसिएशन यांच्या वतीने त्रिवेंद्रम टेनिस क्लब या ठिकाणी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुण्याच्या वैष्णवी आडकरने उपविजेते पद मिळविले. १६ वर्षांखालील गटात वैष्णवीने हे यश मिळविले आहे.

या वेळी झालेल्या अंतिम फेरीत तेलंगणाच्या भक्ती शहा हिच्याबरोबर तब्बल तीन तास वैष्णवीचा सामना रंगला. ज्यामध्ये ३-६, ६- २ आणि ३-६ गुणांनी वैष्णवी उपविजेती ठरली.          

वैष्णवी ही एरंडवणे येथील अभिनव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आठवीत शिकत असून, बाउन्स टेनिस अॅकॅडमीचे केदार शाह यांच्याकडे ती प्रशिक्षण घेत आहे. नुकतेच हैद्राबाद येथे झालेल्या टेनिसच्या नॅशनल सीरीज स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात वैष्णवीने एकेरी व दुहेरी स्पर्धेत यश मिळविले होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link