Next
‘गर्लफ्रेंड’मध्ये संगीतकार हृषीकेश-सौरभ-जसराज यांचा वैविध्यपूर्ण प्रयोग
BOI
Saturday, July 20, 2019 | 01:53 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : सई ताम्हणकर आणि अमेय वाघ पहिल्यांदाच एकत्र येत असलेल्या ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटात संगीतकार हृषीकेश-सौरभ-जसराज यांनी वैविध्यपूर्ण प्रयोग केले असून, हा चित्रपट येत्या २६ जुलैला प्रदर्शित होत आहे. 

हृषीकेश–सौरभ-जसराज यांचे संगीत म्हणजे शास्त्रीय आणि पाश्चात्य संगीताचा उत्तम संगम आहे. चित्रपटाची भाषा बदलत जाते तसे संगीतही विविध टप्प्यांवर आपल्यात बदल घडवत असते. त्यामुळे हा समतोल राखणे संगीतकारासाठी एक मोठे आव्हान असते. संगीतकार हृषीकेश-सौरभ-जसराज यांनी ‘डबल सीट’, ‘मुरांबा’, ‘वाय झेड’, ‘आनंदी-गोपाळ’ अशा विविध चित्रपटातून प्रेक्षकांना सुरेल मेजवानी दिली आहे. या चित्रपटांतील कालानुरूप गाणी ऐकल्यास या संगीतकारांच्या वैविध्यपूर्ण शैलीचा अंदाज येतो. यापूर्वी आलेल्या ‘आनंदी गोपाळ’मधील गाण्यात केलेला ओव्यांचा सुरेल वापर, नाट्यसंगीताचा फील आणि आजच्या पिढीला आपलेसे वाटणारे संगीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते.

‘गर्लफ्रेंड’ चित्रपटातील त्यांच्या गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक गाणे हे वेगळ्या शैलीतील असून, प्रत्येक गाण्याला स्वतःची एक युनिक स्टोरी आहे. सर्व गाणी कथानकाला पुढे घेउन जाण्याचे काम करतात. नचिकेत आणि अलिशा यांची भेट घडणे ते प्रेमात पडण्याचा प्रवास सांगणारे ‘लव्हस्टोरी’ हे रंगमंचाचा फिल देणारे गाणे उत्तम कलाकृतीचा अनुभव देते. शिवाय, प्रेमात पडलेल्या कपलचा एकमेकांशी असणारा कनेक्ट आणि प्रेमाचे नाते सांगणारे ‘कोडे सोपे थोडे’ हे गीत काहीसे इमोशनल करून जाते. तर ‘नच्या गॉट अ गर्लफ्रेंड’ या गाण्याने सोशल मीडियावर धमाल उडवली आहे.

भारतीय शास्त्रीय आणि पाश्चात्य संगीत या दोन्हीवर उत्तम पकड असलेल्या या प्रयोगशील संगीतकार त्रयीला मिर्ची म्युझिक अॅवार्ड, महाराष्ट्राचा फेवरेट कोण, सकाळ प्रीमियर अॅवार्ड अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search