Next
सुरक्षाविषयक सर्वात मोठे प्रदर्शन नवी दिल्लीत
प्रेस रिलीज
Thursday, November 29, 2018 | 05:50 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘इंटरनॅशनल फायर अँड सिक्युरिटी एक्झिबिशन अँड कॉन्फरन्स (आयएफएसईसी) इंडिया एक्स्पो’ सुरक्षितता, नागरीसुरक्षा आणि अग्निसुरक्षा क्षेत्रातील  या दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या प्रदर्शनाचे बारावे पर्व नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे पाच ते सात डिसेंबर या काळात पार पडणार आहे. यूबीएम इंडियाच्या वतीने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून, यामध्ये ब्रिटन, अमेरिका, चीन, तैवान, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, कोरिया, रशिया आदी वीसहून अधिक देश सहभागी होणार आहेत, तसेच ३०० हून अधिक स्थानिक व जागतिक पातळीवर नावाजले गेलेले ब्रँड्स, सरकारी अधिकारी, सल्लगार आणि तज्ज्ञांचा यात समावेश असणार आहे. 

या प्रदर्शनात सीसीटीव्ही, बायोमेट्रिक्स, आरएफआयडी, इंटीग्रेटेड सिस्टम्स, अॅक्सेस कंट्रोल, जीपीएस सिस्टम्स, व्हिडिओ मॅनेजमेंट, पार्किंग ऑटोमेशन, ट्रान्सपोर्ट, पेरीमीटर प्रोटेक्शन, आयओटी, स्मार्टहोम्स, सिक्युरिटी आणि सेफ सिटीज संदर्भातील उत्पादने, तंत्रज्ञान आणि माहिती उपलब्ध होईल.  

याबाबत यूबीएम इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश मुद्रस म्हणाले,‘आयएफएसईसी इंडिया एक्स्पोच्या केंद्रस्थानी असलेला दक्षिण आशियाचा प्रांत काहीसा असुरक्षित आणि विकसनशीलही आहे. मायभूमीच्या सुरक्षेवरील संकटे, वाढणारे शहरीकरण, वाढते गुन्हे आणि जनता-पोलिस यातील अत्यल्प प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. भारत सरकारनेही अस्थिरता वेळीच ओळखत देशात सुरक्षा आणि पाळत ठेवण्यासंबंधी कठोर नियम व निकष लागू केले आहेत. शाळेच्या आवारात मुलांची सुरक्षा आणि महिलांची सुरक्षा हे फारच महत्त्वाचे मुद्दे आहेत. शिवाय, देशाला खऱ्या अर्थाने आधुनिक आणि सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीने सरकारने स्मार्ट शहरांच्या प्रकल्पात आजवर ४८ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. या योजने अंतर्गत भारतात १०० स्मार्ट शहरे निर्माण केली जाणार आहेत. या मुद्दयांचा विचार करता, भारतातील इलेक्ट्रॉनिक सुरक्षेची बाजारपेठ प्रचंड वाढणार आहे, यात काही शंकाच नाही. पुढील दशकभरात या क्षेत्राचा सीएजीआर सुमारे १३ टक्के असेल.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search