Next
आरोग्यविम्याच्या मागणीत मोठी वाढ
‘गोकी इंडिया फिट रिपोर्ट २०१९’ अहवालात स्पष्ट
प्रेस रिलीज
Monday, January 21, 2019 | 02:35 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : आरोग्यसेवांच्या वाढत्या खर्चामुळे भारतीय आरोग्यविम्यावर जास्त लक्ष केंद्रित करणे भाग पडले आहे. ६२.८ टक्के भारतीयांच्या मते आरोग्यविमा पॉलिसी घेणे अत्यावश्यक आहे आणि सुमारे ८५ लोकांच्या मते आरोग्यविमा वयाच्या ३० वर्षांपर्यंत घेतला गेला पाहिजे, असे मत ‘इन्शुरन्स : इन्व्हेस्टमेंट इन हेल्थ’ या नावाच्या ‘गोकी इंडिया फिट रिपोर्ट २०१९’मध्ये व्यक्त करण्यात आले आहे.

‘गोकी’ने इंडिया फिट रिपोर्टच्या पाचव्‍या आवृत्तीचे अनावरण केले. ‘इंडिया फिट रिपोर्ट २०१९’ हा सात लाखांहून अधिक ‘गोकी’ वापरकर्त्यांचा वर्षभराच्या कालावधीत केलेला अभ्यास आहे. याद्वारे भारतीयांची जीवनशैली, आजार (मधुमेह, हृदयरोग आणि हायपरटेंशन), बॉडी मास इंडेक्स, पोषण, पाणी, ताण-तणाव, झोप, उत्सर्जनाचे आरोग्य आणि प्रतिकारशक्ती, धूम्रपान व मद्यपान अशा विविध निकषांवर आरोग्य आणि जीवनशैली यांवर सर्वांगीण अभ्यास केला जातो. या सर्वांचे वर्गीकरण लिंग व महत्त्वाच्या शहरांनुसार केले गेले आहे. या वर्षी ‘इंडिया फिट रिपोर्ट’ने एक पाऊल पुढे टाकत लोकांना आरोग्यविम्याबाबत काय वाटते आणि त्याकडे आरोग्यातील गुंतवणूक म्हणून पाहता येईल का, याचा विचार केला.

या अहवालातून असे दिसून आले की, विम्याचे महत्त्व आणि त्याची गरज यांबाबत जागरूकता वाढत असतानाही २० टक्के प्रतिसादकांकडे अजूनही विमा नाही. विमा समजून घेण्यास गुंतागुंतीचा आहे या कारणामुळे लोक तो घेऊ इच्छित नाहीत. विम्याचा जास्त खर्चही त्यांना त्यापासून परावृत्त करतो. सुमारे ९० टक्के लोकांच्या मते सुदृढ लोकांना आपल्या विम्याचे कमी हप्ते भरायला लागले पाहिजेत. ७० टक्के लोक आपल्या आरोग्याची माहिती विमा कंपन्यांना देऊन हप्त्यांवर सवलत मिळवण्यासाठी तयार आहेत. प्रतिसादकांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, कॅशलेस हॉस्पिटलायझेशन (८७.९ टक्के) हा सर्वाधिक पाहिला जाणारा आरोग्यविमा फायदा असून, त्यापाठोपाठ वैद्यकीय बिलांच्या परताव्याची सुविधा (६७.७) आणि सर्वोत्तम रूग्णालयांमध्ये चांगले उपचार (५९.०) यांचा समावेश आहे.

४२.३ टक्के लोक एक विशिष्ट विमा त्यातून मिळणाऱ्या चांगल्या दर्जाच्या रुग्णालय नेटवर्कसाठी निवडतात. या शिवाय, ४१.९ टक्के लोक एका विशिष्ट कंपनीकडून विमा घेतात, कारण त्याची दावा प्रक्रिया सोपी असते आणि रुग्णालयाचे नेटवर्कही चांगले असते. कमी खर्च, चांगले कव्हरेज व फायदे, साध्या अटी आणि शर्ती हे काही महत्त्वाचे घटक आहेत, ज्यामुळे लोक आरोग्यविमा खरेदी करतात.

या शिवाय, या अहवालातून असे दिसून आले, की २० ते ४५ वर्षे वयोगटांतील सुमारे ३८.३ टक्के लोकांना मधुमेह, बीपी, कार्डियक समस्या ते थायरॉइड, एक्युट जीआय आणि अॅसिडिटी अशा किमान एका जीवनशैली आजाराने ग्रासलेले आहे. मागील दोन वर्षांत जीवनशैलीशी संबंधित आजार वाढले आहेत. वापरकर्त्यांमध्ये कोलेस्टरॉलची प्रकरणे या वर्षी १०.एक टक्क्यांवरून १४.१ टक्क्यांवर गेली आहे. उच्च रक्तदाबाचे प्रमाणही नऊ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.

सुदृढ राहण्याच्या बाबतीत बंगळुरूमधील लोक आघाडीवर आहेत. या अहवालानुसार, बंगळुरू हे शहर मुंबईला मागे टाकून पुन्हा एकदा भारतातील सर्वाधिक सुदृढ शहर ठरले आहे; परंतु वायू प्रदूषण हा भारतीयांना मोठ्या प्रमाणावर त्रासदायक ठरणारा एक महत्त्वाचा घटक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. ‘इंडिया फिट रिपोर्ट’ने तीन मुलभूत निकषांवर आठ मोठ्या शहरांचा अभ्यास केला. त्यात हवा, पाणी आणि अन्न यांचा समावेश होता. या निकालानुसार पुणे हे हवा, पाणी आणि अन्नाच्या दर्जाबाबत सर्वाधिक राहण्यायोग्य शहर ठरले असून, हवेच्या दर्जाबाबत दिल्ली हे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे.

‘इंडिया फिट रिपोर्ट २०१९’च्या निष्कर्षांबाबत बोलताना ‘गोकी’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल गोंदल म्हणाले, ‘आरोग्यसेवेतील विश्वास आणखी कमी झाला आहे आणि आरोग्याबाबत नव्याने विचार करण्याची प्रचंड गरज आहे. आम्ही बदलाबाबत विचार करत आहोत आणि लोकांना प्रतिक्रियात्मक तसेच, उपचारांवर आधारित आरोग्यसेवेकडून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा यंत्रणेकडे नेण्याच्या प्रयत्नात आहोत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search