Next
‘पेटीएम मॉल’ची आसुस इंडियासह धोरणात्मक भागीदारी
प्रेस रिलीज
Thursday, May 03 | 05:49 PM
15 0 0
Share this story

पीओएस सुविधा दाखल करताना पेटीएम मॉलचे सीओओ अमित सिन्हा आणि आसुस इंडियाचे साऊथ एशिया आणि भारत प्रादेशिक प्रमुख लिऑन वाययू

मुंबई : ‘पेटीएम इ कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड’च्या मालकीतील पेटीएम मॉलने, रिटेल स्टोअर्ससाठी पीओएस सुविधा सादर केली आहे. यामुळे दुकानदार त्यांच्या ऑफलाइन आणि ऑनलाइन ग्राहकांचे व्यवस्थापन करू शकतील. आसुस रिटेल स्टोअर्समध्ये हे पीओएस समाधान लागू करण्यासाठी कंपनीने आसुस इंडियासोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे. ही सुविधा इतर ब्रँड्स आणि रिटेल स्टोअर्ससाठी देखील उपलब्ध होणार आहे. 

कंपनीने आपल्या ऑनलाइन मंचावरून ‘व्हीवोबुक एक्स ५०७’ हा लॅपटॉप दाखल केला आहे. तो आसुस ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून देखील उपलब्ध आहे. त्याशिवाय, पेटीएम मॉल आसुस ऑफलाइन स्टोअर्सना आपल्या नावीन्यपूर्ण ‘डिजिटल एक्स्पीरियन्स झोन’ने आणि पेटीएम मॉल क्यूआरने सक्षम करणार आहे. ज्यामुळे ग्राहकांना दुकानातूनच आसुस उत्पादने ऑर्डर करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

पेटीएम मॉलचे सीओओ अमित सिन्हा म्हणाले, ‘पेटीएम मॉलवर आणि आसुसच्या भागीदार ऑफलाइन स्टोअर्समार्फत ‘आसुस व्हीवोबुक एक्स५०७’ लॅपटॉप श्रेणीसाठी आसुसशी भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्या देशातील सुमारे ८० टक्के ऑफलाइन रिटेल स्टोअर्सकडे त्यांच्या इन्व्हेटरीचे व्यवस्थापन करणारे आवश्यक असे तंत्रज्ञान नाही. आमचे ‘ओ टू ओ’ मॉडेल ऑफलाइन दुकानदारांच्या गरजेनुसार आहे. त्यामुळे आम्ही हे समग्र सोल्युशन, पेटीएम मॉल पीओएस सादर करत आहोत. ते आता दुकानात येणा-या  ग्राहकांना सोयिस्कररित्या सेवा देऊ शकतात; तसेच या पीओएस यंत्रणेच्या मदतीने स्थानिक स्तरावर ऑनलाइन ऑर्डर्स पूर्ण करू शकतात.पहिल्या टप्प्यात आम्ही आसुस ब्रॅंडच्या ऑफलाइन स्टोअर्सना सक्षम करत असून, लवकरच त्याचा आणखीन विस्तार करणार आहोत.’

साऊथ एशिया आणि भारत, आसुस इंडियाचे प्रादेशिक प्रमुख लिऑन वाययू म्हणाले, ‘पेटीएम मॉलशी भागीदारी करून ‘व्हीवोबुक एक्स५०७’ लॅपटॉप दाखल  करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.त्याचा अद्भुत लुक आणि वैशिष्ट्ये बाजारातील किफायतशीर अशा इतर सर्व लॅपटॉपच्या श्रेणीत उठून दिसतील अशी आम्हाला खात्री आहे. त्या व्यतिरिक्त पेटीएम मॉलच्या सहयोगाने, ग्राहकांचा खरेदीचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी नावीन्यपूर्ण सेवा देण्यासाठी  आम्ही उत्सुक आहोत. या भागीदारीमुळे आम्ही आमच्या भागीदारांना सक्षम बनवू शकू आणि त्यांना डिजिटल नेटवर्कची विस्तृत श्रेणी पुरवू शकू, ज्याच्यामुळे आमच्या ग्राहकांना खरेदीचा अधिक दर्जेदार अनुभव घेता येईल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link