Next
पंढरपुरात सोमवारी महास्वच्छता अभियान
BOI
Saturday, July 14, 2018 | 11:40 AM
15 0 0
Share this story

पंढरपूर : ‘आषाढी वारी सोहळ्यासाठी पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना स्वच्छ पंढरपूर आणि सुंदर पंढरपूर पाहायला मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत १६ जुलै रोजी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

पंढरपूर व परिसरामध्ये राबविण्यात येणारे महास्वच्छता अभियान सकाळी सहा वाजता सुरू होणार आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांबरोबरच स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, विविध खाजगी संस्था व नागरिकही सहभागी होणार आहेत.

पंढरपूर व परिसराची स्वच्छता चांगल्या पद्धतीने होऊन महास्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविले जावे यासाठी १० विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक विभागासाठी समन्वय अधिकारी व त्यांना स्वच्छतेसाठी परिसर ठरवून दिला आहे. समन्वय अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या परिसराची स्वच्छता करायची असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

समन्वय अधिकारी नाव व पदनाम स्वच्छतेसाठी दिलेला परिसर असा : सदाशिव पडदुणे (तहसीलदार, माढा वाखरी परिसर), किशोर बडवे (तहसीलदार मोहोळ, ६५ एकर), विनोद रणवरे (तहसीलदार, उत्तर सोलापूर, चंद्रभागा नदी घाट, वाळवंट परिसर, दगडी पूल ते उद्धव घाट), ऋषीकेत शेळके (तहसीलदार, बार्शी, चंद्रभागा नदी घाट व वाळवंट परिसर, महाद्वार घाट ते विप्रदत्त घाट व पुंडलिक मंदिर परिसर), मधुसूदन बर्गे (तहसीलदार, पंढरपूर प्रदक्षिणा मार्ग), संजय पवार (तहसीलदार, करमाळा मंदिर परिसर), हणमंत कोळेकर (तहसीलदार, अक्कलकोट स्टेशन रोड व परिसर), अमोल कदम (तहसीलदार, दक्षिण सोलापूर, चंद्रभागा नदी घाट व वाळवंट परिसर, उद्धव घाट ते महद्वार घाट), संजय पाटील (तहसीलदार, सांगोला पत्राशेड परिसर व दर्शनबारी), आप्पासाहेब समिंदर (तहसीलदार,  मंगळवेढा- भक्ती मार्ग व परिसर).
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
सौदागर जोशी About 224 Days ago
कार्टुन आवडले
1
0
दत्ता रोकडे About 224 Days ago
छान नियोजन
1
0

Select Language
Share Link