Next
सर्वसामान्य लोकांना लखपती होण्याची संधी
सुबोध भावे घेऊन येतोय ‘लाखांची गोष्ट’
BOI
Tuesday, January 22, 2019 | 12:43 PM
15 0 0
Share this article:

‘लाखांची गोष्ट’ नावाच्या प्रश्नमंजूषा कार्यक्रमाबाबत माहिती देताना सुबोध भावे, लेखक, दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे व आयोजिका अनघा मोडक.

पुणे : सर्वसामान्य नागरिकांना लखपती होण्याची संधी मिळावी या उद्देशाने ‘शुअर वेल्थ मॅनेजमेंट एलएलपी या संस्थेचे प्रवर्तक श्रीहरी धर्माधिकारी आणि अनघा मोडक यांनी ‘लाखांची गोष्ट’ नावाचा सामान्यज्ञानावर आधारीत एक अनोखा प्रश्नमंजूषा कार्यक्रम आयोजित केला आहे. हा कार्यक्रम राज्यभर रंगमंचावर सादर होणार असून, अभिनेता सुबोध भावे त्याचे सूत्रसंचालन करणार आहे.  

याबाबत आयोजिका अनघा मोडक, अभिनेता सुबोध भावे आणि लेखक दिग्दर्शक मिलिंद शिंत्रे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

अनघा मोडक म्हणाल्या, ‘सामान्य ज्ञानाच्या आधारावर सर्वसामान्य जनता; तसेच निम्न आर्थिक स्तरातील लोकांनाही लखपती होता येईल या भावनेतून हा कार्यक्रम सादर करण्याची कल्पना श्रीहरी धर्माधिकारी आणि माझ्या  मनात आली. त्यातून या कार्यक्रमाची रूपरेषा तयार झाली. हा कार्यक्रम मराठी भाषेत सादर होणार असून, त्यात सामान्यज्ञानावर आधारीत प्रश्न प्रेक्षकांना म्हणजेच स्पर्धकांना विचारण्यात येतील. प्रत्येक प्रेक्षकाला बक्षिस मिळवण्याची समान संधी असेल.’

‘‘लाखांची गोष्ट’ हा अशा प्रकारचा रंगमंचावरील पहिलाच कार्यक्रम आहे. रंगमंचावर या पूर्वी असा कार्यक्रम कुठेही झालेला नाही. या कार्यक्रमातील सर्वोच्च पारितोषिक २५ लाख रुपयांचे असून, प्रत्येक कार्यक्रमात ते प्रत्येक प्रेक्षकाला मिळवता येण्याची संधी आहे. या कार्यक्रमाचे लेखन आणि दिग्दर्शन मिलिंद शिंत्रे यांचे आहे.येत्या मार्च महिन्यापासून महाराष्ट्रातील विविध शहरांमधून हा स्पर्धात्मक कार्यक्रम राबवण्यात येणार आहे,’ असेही मोडक यांनी सांगितले. 

या स्पर्धेसाठी www.lakhanchigoshta.com हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, या संकेतस्थळाचे उद्घाटन भावे यांच्या हस्ते करण्यात आले. 

‘प्रश्नमंजूषा स्पर्धा आणि तिचे सर्व नियम, अटी इत्यादीबाबत सर्व सविस्तर माहिती www.lakhanchigoshta.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून, याच संकेतस्थळावर ऑनलाइन नाव नोंदणी चालू झाली आहे. १८ वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीस स्पर्धेत सहभागी होता येईल,’ असेही आयोजकांनी या वेळी सांगितले.


नावनोंदणीसाठी : www.lakhanchigoshta.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search