Next
गीत रामायणाचा भरतनाट्यम् नृत्याविष्कार
प्रेस रिलीज
Friday, March 23 | 05:35 PM
15 0 0
Share this story


पुणे :  रामनवमीचे औचित्य साधून ज्येष्ठ कवी ग. दि. माडगूळकर आणि ज्येष्ठ संगीतकार सुधीर फडके यांच्या अजरामर ठरलेल्या गीत रामायणावर अधारित भरतनाट्यम् नृत्याविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘संतोष पोतदार इव्हेंट्स आणि कलादर्शन प्रॉडक्शन्स’तर्फे रविवारी, २५ मार्च रोजी एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रामनवमीच्या दिवशी कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रात्री नऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना आणि नृत्य दिग्दर्शन गुरू सौदामिनी राव यांचे आहे. संतोष पोतदार, अमिता गोडबोले आणि कल्पना बालाजी यांनी त्याची निर्मिती केली आहे. हा कार्यक्रम सशुल्क आहे. 

या कार्यक्रमाबद्दल माहिती देताना संतोष पोतदार म्हणाले, ‘कला क्षेत्रात अमूल्य योगदान देऊन संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ कवी गदिमा आणि संगीतकार सुधीर फडके अर्थात बाबूजी यांच्या मूळ रचनांवर अधारित ‘गीत रामायण’ भरतनाट्यम या कला प्रकारातून रसिकांसमोर येणार आहे. कला रसिक पुणेकरांसाठी या सांगीतिक कार्यक्रमाचा अनुभव घेणे, ही रामनवमीची अनोखी पर्वणी ठरणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link