Next
अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात बालसभा; गांधीजी, शास्त्रीजी यांना अभिवादन
BOI
Thursday, October 03, 2019 | 02:04 PM
15 0 0
Share this article:



रत्नागिरी :
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी रत्नागिरीतील अभ्यंकर प्राथमिक विद्यालयात बालसभा आयोजित करण्यात आली होती. या बालसभेतून या नेत्यांना अभिवादन करण्यात आले. 

अध्यक्ष निवड, अध्यक्षाचे नाव सुचवून अनुमोदन देणे, स्वागत, निवेदन, आभार अशा सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनीच केल्या. इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी याचे नियोजन केले होते.



बालसभेचे अध्यक्षपद अभिराम तगारे याने भूषवले. प्रारंभी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेतील निवडक भाषणे विद्यार्थ्यांनी सादर केली. मुख्याध्यापक विनोद नारकर आणि शिक्षक प्रकाश कदम यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. 

नारकर यांनी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे नेतृत्व आणि कर्तृत्वाची गोष्ट सांगून विद्यार्थ्यांनी हे गुण आपल्या अंगी बाणवावेत, असे सांगितले. लायन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल नारकर यांनी या वेळी प्रकाश कदम यांचा सत्कार केला.



बालसभेचे सूत्रसंचालन चिन्मयी भाटकर हिने केले. यामध्ये अद्वैत आगरे, राजरत्न पवार, सई कुळकर्णी, पर्णिका परांजपे, मैत्रेयी देसाई, स्वरा आयरे, दिव्या देऊरकर यांनी भाग घेतला. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजनासाठी मार्गदर्शन केले.

वक्तृत्व स्पर्धेचा निकाल असा : इयत्ता पहिली - मुद्रा जोशी, निधी जोशी, स्वरा साळुंखे, उत्तेजनार्थ - श्रीया बाणे, विदुला चव्हाण, दूर्वा मेणे, भूमी कोलगे, तनिष्का खेडेकर, अथर्व जाधव, झलक सांडीम. इयत्ता दुसरी - प्रथम (विभागून) मुक्ता बापट व आस्था राऊत, सोनाक्षी सरदेसाई, जान्हवी गोताड. उत्तेजनार्थ - प्रांजल धारवे, निधी कदम, विभव साठ्ये, श्रीधर पाटील, गौरी मयेकर. तिसरी - चिन्मय फडके, आर्य दांडेकर, तपस्या बोरकर व रुद्र घडशी, उत्तेजनार्थ - श्रावणी राऊत, श्रेया मोरे, अवनी घडशी, सुमित तोडणकर, श्रेया विलणकर. चौथी - पूर्वा जोशी, अभिराम तगारे, मैत्रेयी देसाई. उत्तेजनार्थ - सई शिंदे, आदित्य बनगर, चिन्मयी भाटकर, स्वरा आयरे, राजरत्न पवार, स्मित पानगले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search