Next
देवी भगवतीच्या गीतांच्या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन
BOI
Tuesday, March 19, 2019 | 04:53 PM
15 0 0
Share this article:

रत्नदुर्ग किल्ल्यावरील भगवती देवीच्या ‘रत्नागिरीची माऊली आई भगवती’ या ध्वनिमुद्रिकेचे प्रकाशन करताना राजाभाऊ लिमये, मुग्धा भट-सामंत, सुधाकर मोंडकर आणि मान्यवर

रत्नागिरी : महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवतीच्या ध्वनिमुद्रिकेचा प्रकाशन सोहळा मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य राजाभाऊ लिमये आणि शास्त्रीय संगीत गायिका मुग्धा भट-सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यामुळे आता देवीचा महिमा भक्तांना गीतांच्या स्वरूपात ऐकायला मिळणार आहे.

या प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर, उपाध्यक्ष भाई सारंग, सचिव प्रकाश कीर, रमेश दळवी, सुरेश निकम, अभय सावंत, मंगेश हरम, गीतकार व गायक संदेश नागवेकर उपस्थित होते. श्री देवी भगवतीच्या शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. त्याचे औचित्य साधून हे प्रकाशन करण्यात आले. ‘रत्नागिरीची माऊली आई भगवती’ या नावाने ही तयार ध्वनिमुद्रिका तयार करण्यात आली आहे.

अध्यक्ष सुधाकर मोंडकर यांनी देवस्थानच्या विविध कार्यांचा आढावा घेऊन देवीच्या गीतांची सीडी सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले. ‘रत्नागिरीची माऊली आई भगवती’ ही सीडी भाविकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास गायिका मुग्धा सामंत यांनी व्यक्त केला.

गायक नागवेकर यांनी सीडीमध्ये गाण्याची संधी दिल्याबद्दल देवस्थानचे आभार मानले. जीर्णोद्धार समिती सदस्य लिमये यांनी मंदिराच्या वाढत चालेल्या प्रसिद्धीचे आणि कार्याचे कौतुक करून देवस्थानाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. ही ध्वनिमुद्रिका बनविण्यासाठी संदेश नागवेकर, अभिजित तथा मनू गुरव, उदयराज सावंत आणि अवधूत चव्हाण यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल देवस्थानतर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी देवस्थानचे मानकरी, विश्वस्त आणि उत्सव कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश जगताप यांनी केले. आभार देवस्थानचे उपाध्यक्ष भाई सारंग यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search