Next
इंग्रजांची कोठी
BOI
Thursday, March 28, 2019 | 11:00 AM
15 0 0
Share this article:

बांसपुरा जिल्ह्याचे सीडीओ बी. डी. रेड्डी आणि नीलिमा यांच्या विवाहाच्या रिसेप्शनची पार्टी सुरू असतानाच मंत्रिमहोदय डीएमबरोबर वर्ल्ड बँकेसाठी नरसिंह टीला या गावात जाऊन शासकीय योजनांच्या लाभार्थींचा सर्व्हे करण्याविषयी चर्चा करतात. हे काम करण्याची तयारी रेड्डी दाखवितात. नीलिमासह ते नरसिंह टील्याला कूच करतात. तेथे गावचा प्रमुख चौधरी त्यांचे स्वागत करतो. त्यांची व्यवस्था इंग्रजांच्या कोठीत करतो. या दौऱ्यात स्वातंत्र्यसेनानी रहमतमियाँ व योजनेचा लाभार्थी काळूराम यांची भेट घ्यायची असल्याचे रेड्डींनी सांगितल्यावर चौधरीच्या मनात संशयाची पाल चुकचुकते. रहमतमियाँना त्याच्या काळ्या धंद्यांविषयी सर्व माहिती असते. ही गोष्ट उघडकीस येऊ नये, म्हणून तो बीडीओ अन् पटवारी यांना हाताशी धरतो. रहमतमियाँ यांचा बेरोजगार मुलगा आदिललाही तो खोट्या गुन्ह्याच्या आरोपाखाली पोलिसांना अटक करायला लावतो. हे कथानक आहे राकेशकुमार पालीवाल यांच्या ‘इंग्रजांची कोठी’ या हिंदी कादंबरीचे. स्वातंत्र्यानंतरही देशात वर्षानुवर्षे कायम असलेले वास्तव यातून समोर येते. याचा मराठी अनुवाद प्रभा शेटे यांनी केला आहे.

पुस्तक : इंग्रजांची कोठी
लेखक : राकेशकुमार पालीवाल
अनुवाद : प्रभा शेटे
प्रकाशक : सुरेश नवरे
पृष्ठे : २९४
मूल्य : ३५०

( ‘इंग्रजांची कोठी’ हे पुस्तक बुकगंगा डॉट कॉम’ वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search