Next
मौजे खडकी येथील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
नागेश शिंदे
Thursday, January 31, 2019 | 02:23 PM
15 0 0
Share this story



हिमायतनगर :
तालुक्यातील मौजे खडकी येथे हदगाव-हिमायतनगरचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर आणि माजी शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कोहळीकर यांचा नागरी सत्कार २९ जानेवारी रोजी करण्यात आला. त्या वेळी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. 

पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार पाटील होते, तर प्रमुख अतिथी म्हणून कोहळीकर उपस्थित होते. हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती श्यामराव चव्हाण, उपसभापती विशाल परभणकर, हिमायतनगर शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, नगराध्यक्ष कुणाल राठोड, डॉ. संजय पवार आणि गजानन चायल या वेळी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर आमदार पाटील, कोहळीकर, श्यामराव चव्हाण, विशाल परभणकर, रामभाऊ ठाकरे, कुणाल राठोड, डॉ. संजय पवार आणि गजानन चायल यांचा खडकी येथील कार्यकर्त्यांकडून नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर खडकी येथील ज्ञानेश्वर राहुलवाड, विनोद वच्छेवाड व शेख मोशीन यांच्या नेतृत्वाखाली असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. त्यानंतर मार्गदर्शनपर भाषणे झाली.

येत्या आठ दिवसांत दोन-तीन बोअरवेल खोदून गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार नागेश पाटील यांनी दिले. 

या वेळी खडकी येथील तंटामुक्ती समिती अध्यक्ष साहेबराव शेटे, ज्ञानेश्वर राहुलवाड, सुदाम नारखेडे, साहेबराव सूर्यवंशी, पंडित शिरगिरे, वसंत राठोड, गजानन नारखेडे, विठ्ठल नारखेडे, साहेबराव मनमंदे, सुभाष पडगेवाड उपस्थित होते. आमदार पाटील यांनी ज्ञानेश्वर राहुलवाड यांची खडकी शिवसेना गण प्रमुखपदी नियुक्ती केली. विनोद वच्छेवाड यांची खडकी शिवसेना शाखाप्रमुखपदी व शेख मोशीन यांची युवासेना अल्पसंख्याक तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. श्रीनिवास शेट्ये, तानाजी शिंदे, शिवाजी पाटील सूर्यवंशी, योगेश राठोड, ज्ञानेश्वर तातीकुंडलवाड, शुभम ठाकरे, तानाजी सोळंकी, सचिन डांगे, आदींची विविध पदांवर निवड करण्यात आली. उपस्थितांचे आभार विनोद वच्छेवाड यांनी मानले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link