Next
‘फ्लिपकार्ट’तर्फे ‘फ्लिपकार्ट प्लस’ उपक्रम
प्रेस रिलीज
Monday, August 06 | 03:18 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘फ्लिपकार्ट’ या भारतातील सर्वांत मोठ्या ई-कॉमर्स बाजारपेठेने भारतीय ग्राहकांसाठी ‘फ्लिपकार्ट प्लस’चे उद्घाटन करणार असल्याची घोषणा केली. ‘फ्लिपकार्ट प्लस’ हा अनेक वर्षांच्या डेटा अॅनालिसिसचा आणि ‘फ्लिपकार्ट’च्या ग्राहकांच्या प्राधान्यांच्‍या अभ्यासाचा परिणाम असलेला हा भारतातील पहिला उपक्रम आहे. याशिवाय, अनेक मोठ्या इंटरनेट कंपन्या या उपक्रमात सहभागी होऊन भारतात आयोजित सर्वोत्तम बेनिफिट प्रोग्रामपैकी एक बनवण्यासाठी प्रयत्नशील झाल्या आहेत.

‘फ्लिपकार्ट प्लस’ हा आपल्या समावेशाच्या घटकांसह संपूर्ण देशभरातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी असलेला बेनिफिट प्रोग्राम असून, त्यातून शुल्क न भरता सदस्यत्व आणि विविध प्रकारच्या गोष्टी ग्राहकांना दिल्या जातात. या कार्यक्रमातून प्रत्येक ठिकाणच्या ग्राहकांना उत्तम दर्जाचा अनुभव दिला जाईल आणि त्यातील प्रमुख वैशिष्टे म्हणजे मोफत व वेगवान डिलिव्हरी, बिग फेस्टिव्ह सीझन सेल्ससारख्या मोठ्या सेल उपक्रमांना लवकर सुरुवात आणि एक चांगला ग्राहक सहकार्य अनुभव ही आहेत. याशिवाय, अनावरणानंतर, ‘फ्लिपकार्ट’च्या सर्व ग्राहकांना प्रत्येक ऑर्डरसोबत ‘प्लस कॉइन्स’ जिंकता येतील आणि खरेदी, पर्यटन व विविध गोष्टींचे फायदे त्यांना मिळतील.

‘फ्लिपकार्टमध्ये आम्ही भारतीय ग्राहकांच्या गरजा नीट समजून घेतो आणि त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपाय शोधतो. याचाच अर्थ असा की, आम्ही जे काही करतो ते समाजाच्या विशिष्ट वर्गापुरते मर्यादित नसून मोठ्या प्रमाणावरील ग्राहकांना लागू आहे. हीच गोष्ट लक्षात ठेऊन आम्ही ‘फ्लिपकार्ट प्लस’ हा भारतातील सर्वाधिक सर्वसमावेशक ग्राहक फायदा कार्यक्रम तयार केला आहे आणि तो या स्वातंत्र्यदिनी आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे,’ असे मत ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले.

ग्राहक पुरस्कार कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यमान निकष कंपनीच्या मूलभूत व्यवसायात फायदे देण्याचे असून, ‘फ्लिपकार्ट प्लस’कडून भागीदारांच्या माध्यमातून ग्राहकांना उत्पादने निवडण्याच्या संधी दिल्या जातील. त्यांची व्यापक व्याप्ती, अपील आणि ग्राहकांच्या विविध वर्गांच्या गरजा पूर्ण करणारे डिझाइन यांच्याद्वारे ‘फ्लिपकार्ट प्लस’ हे रिवॉर्ड्स उद्योगावर मोठा परिणाम करण्यासाठी तसेच भारतात इ- वाणिज्यच्या क्षेत्रातील उत्क्रांतीला चालना देण्यासाठी सज्ज आहे.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link