Next
मुकेश
BOI
Sunday, July 22, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

आपल्या दर्दभऱ्या गाण्यांसाठी अजरामर झालेला गायक मुकेश याचा २२ जुलै हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याचा अल्प परिचय...
.......
२२ जुलै १९२३ रोजी दिल्लीमध्ये जन्मलेला मुकेश झोरावरचंद माथुर हा १९४५ ते १९७५ मधली तीस वर्षं आपल्या अनोख्या अंदाजात हिंदी सिनेसंगीत समृद्ध करून गेलेला लोकप्रिय गायक! अनिल विश्वास यांनी चित्रपटांमध्ये गाण्याची संधी दिल्यावर पुढे नौशाद आणि मुख्यत्वे शंकर-जयकिशन आणि कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीतात त्याची गायकी बहरली. त्याच्याजवळ मन्ना डे आणि मोहम्मद रफी यांच्याइतकी शास्त्रीय बैठक नव्हती, किशोरकुमारसारखा खट्याळपणा नव्हता, की तलत मेहमूदइतका तरल स्वर नव्हता; पण तरीही त्याच्या आवाजातला दर्द ऐकणाऱ्यावर जादू करत असे. त्यामुळे त्याची दु:ख मांडणारी गाणी लोकांना भावविभोर करून काळजात रुतणारी ठरली! त्याच्या काळातल्या बहुतेक सर्वच अभिनेत्यांना त्याने आवाज दिला. सुरुवातीला त्याने दिलीपकुमार आणि पुढच्या काळात मनोजकुमारसाठी जरी बरीच गाणी गायली असली, तरीही तो राज कपूरचा आवाज म्हणूनच ओळखला गेला. त्याला एक राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. निर्दोष, आदाब अर्ज, माशूका, अनुराग - अशा सिनेमांत त्याने अभिनयसुद्धा केला होता. जिंदा हूँ इस तरह के गमे, झूम झूम के नाचो आज, हम आज कहीं दिल खो बैठे, तू कहे अगर, हम तुझ से मोहब्बत कर के सनम, आवारा हूँ, छोड गए बालम, आंसू भरी है ये जीवन की राहें, वो सुबह कभी तो आएगी, किसी की मुस्कराहटों पे, मेरे टूटे हुए दिल से, चांद आहे भरेगा, तुम जो हमारे मीत ना होते, तुम अगर मुझ को ना चाहो, दोस्त दोस्त ना रहा, चाँद सी मेहबूबा, मैं तो इक ख्वाब हूँ, दुनिया बनानेवाले, सजन रे झूठ मत बोलो, जिंदगी ख्वाब है, वो तेरे प्यार का गम, चंदन सा बदन, जीना यहाँ मरना यहाँ, जाने कहाँ गये वो दिन, कई बार यूँ ही देखा है, कही दूर जब दिन ढल जाए , वक्त  करता जो वफा यांसारखी असंख्य सोलो गाणी आणि अशीच कित्येक द्वंद्वगीतं त्याने अजरामर केली आहेत. २७ ऑगस्ट १९७६ रोजी त्याचा डेट्रॉइटमध्ये मृत्यू झाला.
(मुकेशच्या काही गाण्यांचा रसास्वाद घेणारे ‘सुनहरे गीत’ सदरातले लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

यांचाही आज जन्मदिन :
‘महाराष्ट्र टाइम्स’चं संपादकपद दीर्घकाळ भूषविलेले गोविंद तळवलकर (जन्म : २२ जुलै १९२५, मृत्यू : २१ मार्च २०१७)
(गोविंद तळवलकर यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.) 

महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (जन्म : २२ जुलै १९७०)

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (जन्म : २२ जुलै १९५९)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link