Next
‘महिंद्रा’ने दाखल केली नवी ‘टीयूव्ही ३०० प्लस’
प्रेस रिलीज
Saturday, June 23, 2018 | 12:26 PM
15 0 0
Share this story

मुंबई : महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या महिंद्रा अँड महिंद्रा लि. (एमअँडएम लि.) या कंपनीने ऐसपैस अंतर्भाग व गाडी चालवण्याचा सुखद अनुभव देणारी अशी प्रीमिअम एसयूव्ही खरेदी करून जीवनशैली उंचवण्याची इच्छा असलेल्या चोखंदळ ग्राहकांसाठी ‘टीयूव्ही३०० प्लस’ दाखल केल्याचे जाहीर केले.

९.४७ लाख रुपये (एक्स-शोरूम मुंबई) किंमत असलेली ‘टीयूव्ही३०० प्लस’ भारतीय ऑटो क्षेत्रातील १० लाख रुपयांखालील, समकालीन, शक्तिशाली व लवचिक ९-सीटर एसयूव्हीची कमतरता भरून काढणार आहे. ‘टीयूव्ही३०० प्लस’मध्ये २.२ लिटर एमएचएडब्ल्यूकेडी१२० इंजिन बसवले असून, त्याची क्षमता ८८ केडब्ल्यू (१२०बीएचपी) आहे. त्यामध्ये हायवेवर गाडी चालवण्याचा आनंद मिळण्यासाठी ६-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे.

ठसठशीत डिझाइन व एसयूव्हीची ऐट यामुळे ही गाडी अतिशय स्टायलिश व शक्तिशाली दिसते. पिनिनफेरिना या इटालियन डिझाइन हाउसने अंतर्भागाचे डिझाइन केले आहे व फॉक्स लेदर सीट्समुळे ‘टीयूव्ही३०० प्लस’ प्रीमिअम वाटते. त्यामध्ये विविध प्रकारची हाय-टेक वैशिष्ट्ये आहेत, जशी १७.८ सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम व जीपीएस नेव्हिगेशन आणि इको मोड, मायक्रो हायब्रिड टेक्नालॉजी.

महिंद्रा अँड महिंद्रा लि.चे सेल्स व मार्केटिंग ऑटोमोटिव्ह सेक्टर, प्रमुख विजय राम नाकरा म्हणाले, ‘सप्टेंबर २०१५मध्ये दाखल केल्यापासून ‘टीयूव्ही३००’ अतिशय यशस्वी ठरली आहे आणि सध्या ८० हजार गाड्या रस्त्यावर धावत आहेत. आता, अधिक जागा व पॉवर असलेली एसयूव्ही खरेदी करण्याची इच्छा असलेल्या ग्राहकांसाठी आम्ही ‘टीयूव्ही३०० प्लस’ दाखल करत आहोत. आकांक्षा व जीवनशैली यांना साजेशी एसयूव्ही हवी असलेल्या ग्राहकांना ‘टीयूव्ही३०० प्लस’ निश्चितच आवडेल.’

‘टीयूव्ही३०० प्लस’विषयी :
कुशन सस्पेन्शन टेक्नालॉजीचा वापर करणारी ‘टीयूव्ही३०० प्लस’ सर्व प्रकारच्या रस्त्यावर उत्तम अनुभव देते. पिनिनफेरिना या इटालियन डिझाइन हाउसने अंतर्भागाचे डिझाइन केले आहे व फॉक्स लेदर सीट्समुळे ‘टीयूव्ही३०० प्लस’ अधिक प्रीमिअम दिसते. गाडीमध्ये स्टीअरिंग माउंटेड ऑडिओ व फोन कंट्रोल, रिअर डीफॉगर व वॉश अँड वाइप, ड्रायव्हरची सीट उंच-खाली करण्याची सुविधा, पुढच्या रांगेसाठी आर्मरेस्ट, ड्रायव्हरच्या सीटखाली सोयीचा स्टोअरेज ट्रे आणि लीड-मी-टू-व्हेइकल व फॉलो-मी-होम-हेडलॅम्प आहेत.  

‘टीयूव्ही ३०० प्लस’मध्ये विविध प्रकारची हाय-टेक वैशिष्ट्ये आहेत, जशी १७.८ सेमी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम व जीपीएस नेव्हिगेशन आणि चार स्पीकर्स+दोन ट्वीटर्स, ब्लुसेन्स अॅप, इको मोड, मायक्रो हायब्रिड टेक्नालॉजी, ब्रेक एनर्जी रीजनरेशन टेक्नालॉजी, इंटेलिपार्क रिव्हर्स असिस्ट, एसी इको मोड व ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टीम. आहे. ‘टीयूव्ही ३०० प्लस’मध्ये स्कॉर्पिओपासून केलेले चासिस व मजबूत, उच्च क्षमतेची स्टील बॉडी आहे. त्यामध्ये ड्युएल-एअरबॅग्स व इलेक्ट्रॉनिक ब्रेक-फोर्स डिस्ट्रिब्युशनसह एबीएसही आहे; तसेच पॅनिक ब्रेकिंगच्या वेळी हझार्ड लाइटही सुरू होतात.

‘टीयूव्ही३०० प्लस’ बरोबर ग्राहकांना साजेसा आर्थिक पर्यायही उपलब्ध होणार असून, डाउनपेमेंट अगदी कमी असेल व ईएमआय ११ हजार ९९९ रुपये इतका कमी असेल. त्याचबरोबर कस्टमाइज्ड एएमसी पर्याय मिळणार आहे व पूर्णतः मनःशांती मिळण्यासाठी विस्तारित शिल्ड वॉरंटी (पाच वर्षांपर्यंत) आहे.

ग्राहकांना बोल्ड ब्लॅक, मॅजेस्टिक सिल्व्हर, डायनॅमो रेड, ग्लेशिअर व्हाइट व मोल्टन ऑरेंज पी-फोर, पीसिक्स आणि पी-एट हे तीन प्रकार उपलब्ध आहेत अशा एकूण पाच आकर्षक रंगांतून त्यांच्या पसंतीच्या रंगाची निवड करता येईल.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link