Next
‘डीएलएआय’तर्फे भारताच्या ‘फिनटेक’ मोहिमेला चालना
प्रेस रिलीज
Saturday, May 12 | 11:38 AM
15 0 0
Share this story

मुंबई : डिजिटल लेंडर असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे (डीएलएआय) मुंबईत ‘डीएलएआय फिनटेक’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ‘फिनटेक’ क्षेत्राशी संबंधित ज्ञान आणि अनुभवाची देवाणघेवाण करण्यासाठी या परिषदेमध्ये भारतातील उदयोन्मुख फिनटेक इकोसिस्टमचे प्रमुख भागधारक एकत्र आले होते.

या परिषदेच्या माध्यमातून ‘डीएलएआय’ने विशेषज्ञ समूह, बँकर्स, फिनटेक कंपन्या, उद्यम भांडवलदार, सरकारी प्रतिनिधी, मीडिया प्रोफेशनल्स व स्टार्टअप उत्साहींना भारतातील ‘फिनटेक’बाबत त्यांचे विचार मांडण्यासाठी आणि भावी विकासाला चालना देण्यासाठी परस्पर सहयोग शोधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

‘ड्रायव्हिंग इंडियाज फिनटेक अजेंडा’ या थीमवर आधारित असलेल्या या परिषदेमध्ये देशभरातील ३००हून अधिक सहभागी, तसेच युएसए, युके व चीनमधील विविध प्रख्यात व्यक्ती उपस्थित होते. या वेळी आयोजित चर्चासत्रांमध्ये‍ ‘इक्विटी फायनान्सिंग- नेक्स्ट व्हेव्ह इन अल्टरनेट लेण्डिंग’, ‘कॅपिटल मार्केट, फॅमिली ऑफिसेस– डेब्टस कॅपिटल फॉर अल्टरनेट लेंडर्स’ आणि ‘डेटा प्रायव्ह्सी’ या विषयांवर चर्चा करण्यात आली. परिषदेदरम्यान विविध प्रमुख सत्रे आणि ब्लॉकचेनसोबतच युपीआय २.० व ई-मॅनडेटवर दोन कार्यशाळांचे देखील आयोजन केले होते.

‘डीएलएआय’चे प्रवक्ता अनुराग जैन म्हणाले, ‘डीएलएआय फिनटेक परिषदेच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करताना आम्हाला खूप आनंद झाला. यंदा ही परिषद विविध उत्साहवर्धक कार्यक्रम, चर्चासत्रे व कार्यशाळांसह उत्साहात झाली. विशेषत: तंत्रज्ञानामधील नाविन्यता आणि अधिक आर्थिक-समावेशक समाजाची निर्मिती करण्याचा उद्देश असलेल्या विभागाला मिळालेल्या सरकारच्या पाठिंब्यासह फिनटेक क्षेत्रासाठी हा चांगला काळ आहे. या परिषदेने पुन्हा एकदा फिनटेक क्षेत्रातील विविध प्रमुख भागधारकांना क्षेत्राच्या भविष्याबाबत चर्चा करण्यासाठी एकत्र आणले आहे. बँका, एनबीएफसी किंवा आधुनिक काळातील स्टार्टअप्स असो आर्थिक सेवा क्षेत्राने चांगली प्रगती केली आहे. फिनटेक क्रांती २.० च्या अग्रस्थानी राहण्यासाठी ‘डीएलएआय’ प्रयत्नशील आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link