Next
शापूरजी पालनजी यांचा पुण्यात पहिला प्रकल्प
प्रेस रिलीज
Friday, May 25, 2018 | 05:21 PM
15 0 0
Share this article:

पुणे : शापूरजी पालनजी समूह या देशातील सर्वात विश्वासू आणि जुन्या रिअल इस्टेट ब्रँडने पुण्यात आपला पहिला गृहप्रकल्प दाखल केला आहे. हिंजेवाडी पहिल्या टप्प्याजवळ ‘जॉयविल’ या ब्रँडअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. कोलकाता आणि विरार पाठोपाठ जॉयविल ब्रँडचा हा तिसरा प्रकल्प आहे.

हा प्रकल्प आठ एकरहून अधिक जमिनीवर विस्तारला असून, एक हजारपेक्षा अधिक घरे येथे साकारणार आहेत.  या प्रकल्पात ७५ टक्के मोकळी जागा असून, खेळाचे २५ पेक्षा अधिक प्रकार आहेत. या संकुलात प्रशस्त घरांसमवेत क्लबहाऊस, स्विमिंग पूल, जिम, जॉगिंग, सायकल ट्रॅक, लहान मुलांसाठी क्रीडा सुविधा, मनोरंजन, उद्याने, मोकळी पार्टी लॉन अशा अनेक सुविधा असतील. पात्र ग्राहकांना सीएलएसएस योजनेतंर्गत २.६७ लाखांपर्यंत प्रधानमंत्री आवास योजना लाभ घेता येईल.
 
या शुभारंभाविषयी बोलताना शापूरजी पालनजी रिअल इस्टेटचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि ‘जॉयविल’चे व्यवसाय प्रमुख  श्रीराम महादेवन म्हणाले, ‘भारतातील सर्वात मोठे आयटी केंद्र असलेल्या हिंजेवाडीत पहिला प्रकल्प सुरू करताना आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. हा प्रकल्प आमच्या एकंदर धोरणानुरूप असून, त्यामुळे आमची देशातील मध्यम-उत्पन्न गट गृह बाजारातील अस्तित्व वृद्धिंगत होईल. सध्या या गटाकडून मोठी मागणी आहे. आजच्या काळातील उदयोन्मुख मध्यमवर्गाला चांगल्या जीवनशैलीची महत्त्वाकांक्षा आहे. त्यांच्या स्वमालकीचे घर घेण्याच्या इच्छेत आम्ही कार्यशील भूमिका वठवत आहोत. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही गृह खरेदीदारांच्या गरजा पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. हा प्रकल्प हिंजेवाडी आयटी पार्कच्या अगदी जवळ आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे देखील इथून जवळच आहे. त्याशिवाय हाकेच्या अंतरावर रेल्वे स्थानक, शाळा, मॉल्स, रुग्णालये इत्यादी विविध पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. याठिकाणी काही विकास कामे सुरू आहेत किंवा प्रस्तावित आहेत. त्यापैकी बाणेर आणि बालेवाडीला जोडणारा मुळा नदीवरचा पूल, ११० मीटर रुंद रिंग रोड प्रकल्पाला जोडूनच आहे. आगामी हिंजेवाडी ते शिवाजी नगर असा मेट्रो मार्ग, यामुळे भविष्यात ‘जॉयविल’च्या रहिवाशांना सहज प्रवास शक्य असणार आहे. हिंजेवाडी हे आयजीबीसी गोल्ड प्री-सर्टीफाईड ग्रीन होम आहे. या एकंदर जागेचा ४० टक्के भाग हिरवाईने संपन्न आहे. या प्रकल्पात बांधकामासाठी पुनप्रक्रिया करून पर्यावरण-स्नेही घटकांचा उपयोग करण्यात येणार आहे.’  
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search