Next
सायडोनी गॅब्रिएल कलेट
BOI
Sunday, January 28 | 03:45 AM
15 0 0
Share this story

‘जीजी’ आणि ‘शेरी’ यांसारख्या प्रेमाच्या, प्रणयाच्या कादंबऱ्या लिहून गाजलेली फ्रेंच लेखिका सायडोनी गॅब्रिएल कलेट हिचा २८ जानेवारी हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये तिचा अल्प परिचय...
.......
२८ जानेवारी १८७३ रोजी यनमध्ये जन्मलेली सायडोनी गॅब्रिएल कलेट ही प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार! प्रेमाच्या विवध छटा आणि प्रणयाची धिटाईने केलेली वर्णनं मांडणाऱ्या तिच्या कादंबऱ्या २०व्या शतकाच्या सुरुवातीच्या वर्षांत तुफान लोकप्रिय होत्या.

वयाच्या विसाव्या वर्षी आपल्याहून वीस वर्षांनी मोठ्या असणाऱ्या हेन्री व्हिलाशी तिने लग्न केलं आणि त्याच्याच प्रोत्साहनाने चार वर्षांत तिच्या चार कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. आईविना पोरकं असणाऱ्या क्लॉडिनची कथा सांगणाऱ्या काहीशा आत्मकथनपर अशा त्या कादंबऱ्या लक्षवेधी ठरल्या. क्लॉडिन अॅट स्कूल, क्लॉडिन इन पॅरिस, क्लॉडिन मॅरीड, क्लॉडिन अँड अॅनी! 

कलेटची सर्वांत लोकप्रिय कादंबरी म्हणजे १९४४ सालची ‘जीजी’! एका उमरावाच्या अंगवस्त्राची कहाणी सांगणाऱ्या जीजीची ही कथा तुफान गाजली. पुढे त्या कादंबरीच्या अनिता लूसने केलेल्या नाट्यरूपांतरात ऑड्री हेपबर्नने जीजीच्या भूमिकेत रंगभूमीवर पदार्पण केलं आणि त्या भूमिकेबद्दल तिला ‘थिएटर वर्ल्ड अॅवॉर्ड’ मिळालं. त्या नाटकाचे त्या वेळी २१९ प्रयोग झाले आणि तिथूनच ऑड्रीला हॉलिवूडचे दरवाजे खुले झाले होते.

कलेटची १९२० सालची ‘शेरी’ ही कादंबरीसुद्धा गाजली होती. आपल्यापेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाच्या प्रेमात पडलेल्या प्रौढेची कहाणी, त्यांचं वय, प्रेमभावना यांचा सहजसुंदर आढावा घेणारी वर्णनं यामुळे तीही कादंबरी लक्षवेधी ठरली होती. 

तीन ऑगस्ट १९५४ रोजी तिचा पॅरिसमध्ये मृत्यू झाला.

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link